Join us

ऐन पावसाळ्यात तुळस सुकली, पाने झडून चालली? ३ सोपे उपाय, तुळस पुन्हा बहरेल- होईल डेरेदार....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2023 15:23 IST

Gardening Tips For Tulsi or Basil Plant In Monsoon: ऐन पावसाळ्यात तुळशीचं रोपटं सुकलं असेल तर त्याची काळजी कशी घ्यावी, यासाठी बघा हे काही साधे सोपे उपाय....

ठळक मुद्देसोपे उपाय करून बघा.. तुळस पुन्हा छान खुलून येईल.

झाडांची किंवा गार्डनिंगची आवड असो किंवा नसो, घरासमोर मोठं अंगण असो किंवा मग छोटीशी बाल्कनी असो... प्रत्येक घरामध्ये एक लहान- मोठं तुळशीचं रोपटं (basil) हमखास असतंच असतं. त्या रोपट्याची मनापासून काळजी घेणारेही अनेक आहेत. काही घरांमध्ये तिची फार काळजी घेतली नाही, तरी ती वाढते. कारण पाणी- ऊन- खत अशा सगळ्याच गोष्टी तिला योग्य प्रमाणात मिळत असतात. आता काही घरांमधली तुळस मात्र पावसाळा असूनही कोमेजलेली दिसते. पानं एकतर गळून गेलेली असतात किंवा मग सुकून काळपट हिरव्या रंगाची झालेली असतात. तुमच्या घरच्या तुळशीची देखील अशीच अवस्था झाली असेल तर पुढे सांगितलेले सोपे उपाय करून बघा.. तुळस पुन्हा छान खुलून येईल.(What to do if Tulsi plant is not growing well in rainy season? )

 

तुळस कोमेजून गेली असेल तर काय करावे?१. पाणी तपासून पाहातुळशीच्या रोपाला खूप जास्त पाणी नको असते. अगदी उन्हाळ्यातही दिवसांतून एकदाच पाणी दिले, तरी ते तुळशीला पुरते. त्यामुळे तुमच्या तुळशीला खूप जास्त पाणी तर होत नाही ना, हे एकदा तपासून पाहा.

गॅस सिलेंडर पुरेल जास्त दिवस, ८ सवयी स्वत:ला लावून घ्या, पैशांची होईल चांगलीच बचत

तुळशीचं रोपटं छोटंसं असेल आणि त्याला खूपच पाऊस लागत असेल तर रोपट्याची जागा बदलून पाहा.

 

२. मातीला फंगस असू शकतेतुळशीला पाणी खूप झालं आणि त्या तुलनेत सुर्यप्रकाश कमी मिळाला तर कुंडीतली माती कुजायला लागते.

महालक्ष्मीसाठी १००० रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या आकर्षक साड्या.... बघा स्वस्तात मस्त साड्यांचे सुंदर पर्याय

तिच्यावर फंगस यायला सुरुवात हाेते. अशा खराब झालेल्या मातीत तुळस जास्त काळ टिकू शकत नाही. अशा मातीचा वरचा एक ते दिड इंचाचा थर मुळांना धक्का लागू न देता वर- खाली करावा. त्यात थोडं खत टाकावं.

 

३. सुर्यप्रकाश तुळशीच्या रोपट्याला दिवसातून ४ ते ५ तास तरी चांगलं ऊन मिळालं पाहिजे. एवढं ऊन नाही मिळालं तर तिची पानं गळायला सुरुवात होते. किंवा मग पानांचा रंग काळपट हिरवा होऊन तुळस सुकू लागते. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाऊसमोसमी पाऊस