Lokmat Sakhi >Gardening > तुळशीच्या रोपावर शिंपडा हे ‘पिवळं’ पाणी, तुळस कधीच कोमेजणार नाही- हिरवीगार तुळस वाढवेल प्रसन्नत

तुळशीच्या रोपावर शिंपडा हे ‘पिवळं’ पाणी, तुळस कधीच कोमेजणार नाही- हिरवीगार तुळस वाढवेल प्रसन्नत

Gardening Tips How Revive Dying Tulsi Plant : How to Save Tulsi Plant from Dying in Winters : How To Prevent Tulsi Plant From Dying Tips For Healthy Growth : कितीही काळजी घेतली तरी तुळस कोमेजून जाते, न विसरता लक्षात ठेवा काही गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2024 08:15 AM2024-11-08T08:15:03+5:302024-11-08T15:08:17+5:30

Gardening Tips How Revive Dying Tulsi Plant : How to Save Tulsi Plant from Dying in Winters : How To Prevent Tulsi Plant From Dying Tips For Healthy Growth : कितीही काळजी घेतली तरी तुळस कोमेजून जाते, न विसरता लक्षात ठेवा काही गोष्टी...

Gardening Tips How Revive Dying Tulsi Plant How to Save Tulsi Plant from Dying in Winters How To Prevent Tulsi Plant From Dying Tips For Healthy Growth | तुळशीच्या रोपावर शिंपडा हे ‘पिवळं’ पाणी, तुळस कधीच कोमेजणार नाही- हिरवीगार तुळस वाढवेल प्रसन्नत

तुळशीच्या रोपावर शिंपडा हे ‘पिवळं’ पाणी, तुळस कधीच कोमेजणार नाही- हिरवीगार तुळस वाढवेल प्रसन्नत

आपल्या सगळ्यांच्याच घरात एक छोटंसं तुळशीचं रोपं असत. ही तुळस चांगली हिरवीगार होऊन बहरुन यावी यासाठी आपण तिची विशेष काळजी घेतो. आपल्याकडे तुळशीच्या रोपाला विशेष असे महत्व आहे. तुळशीच्या रोपासंबंधित बऱ्याचजणांची अशी कॉमन तक्रार असते की, तुळशीच रोपं लावल्यानंतर लगेच कोमेजून जाते, तुळशीच्या रोपाची वाढ होत नाही, सारखी पानगळती होते, रोपं हिरवेगार होऊन बहरुन येत नाही. तुळशीच्या रोपासंबंधित अशा एक ना अनेक तक्रारी असतातच(How to Save Tulsi Plant from Dying in Winters).

तुळशीच्या रोपाची विशेष काळजी घेताना अजिबात दुर्लक्ष करून चालत नाही. तुळशीच्या रोपट्याला वेळेवर खत-पाणी न मिळाल्यास ती सुकत जाते. शिवाय पानं पिवळी होऊन गळू लागतात. बऱ्याच जणांच्या घरात तुळशी अधिक दिवस टिकत नाही. योग्य काळजी न घेतल्यास तिची वाढ खुंटते आणि तुळशीचे रोपं दीर्घकाळ चांगले टिकून राहत नाही. खरतरं, तुळशीचे रोपं आपण (Gardening Tips How Revive Dying Tulsi Plant) कुंडीत लावताना अनेक बारीकसारीक चुका करतो. ज्यामुळे तुळशीची वाढ योग्य पद्धतीने न होता ती लगेच कोमेजून जाते. यासाठीच काही घरगुती उपाय करुन करून तुम्ही तुळस दीर्घकाळ चांगली ठेवू शकता. तुळशीच्या रोपाची कशी काळजी घ्यायची ते पाहू. तुळशीचे रोपं लगेच कोमेजून जाऊ नये यासाठी घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरतील(How To Prevent Tulsi Plant From Dying Tips For Healthy Growth).

तुळशीचे रोपं लावताना लक्षात ठेवा ३ गोष्टी... 

तुळशीचं रोप सुकण्याची अनेक कारणं असू सकतात जसं की गरजेपेक्षा जास्त पाणी, खत घालणं, कमी ऊन मिळणं, याव्यतिरिक्त किडे लागणं यामुळे तुळशीचं रोप सुकू लागतं. यासाठीच तुळशीचं रोपं लावण्याआधी त्याच्या मातीकडे विशेष लक्ष द्यावे. तुळशीच्या रोपासाठी मातीचा वापर करताना नेहमी ७० % माती आणि ३० % रेती अशाप्रकारे माती आणि रेती या दोन्हींचा वापर करुन तुळशीचे रोपं लावावे.

दिवाळीत सजावट म्हणून वापरलेली गोंड्यांची फुलं, पणत्या फेकून न देता 'असा' करा वापर, कुंडीतील रोपांची वाढ होईल भरभर...

तुळशीला जास्त पाणी घातल्यामुळे तुळशीच्या मुळांना बुरशी येऊ शकते. यासाठी तुळस लावताना माती आणि रेतीचा वापर केल्यास तुळशीच्या रोपात जास्तीचे पाणी साचून राहत नाही, ज्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत तुळशीला बुरशी न येता ती  चांगली बहरुन येईल. खरंतर तुळशीच्या रोपाला जास्त पाण्याची आवशक्यता नसते. त्यामुळे या रोपट्याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. कारण हे रोपं एक ट्रॉपिकल प्‍लांट आहे. त्यामुळे तुळशीचं रोपं कमी पाणी, हवा आणि सूर्यप्रकाशात जगू शकते.

कावळे-कबुतर कुंडीतील रोपांची नासधूस करतात? करा एक भन्नाट घरगुती युक्ती, रोपं राहतील सुरक्षित...

तुळशीच्या रोपाला फारशा पाण्याची गरज नसते. यामुळे तुळशीच्या रोपाला नियमित पाणी न देता जेव्हा कुंडीतील माती सुकेल तेव्हाच तुळशीच्या रोपाला पाणी घालावे. यामुळे तुळशीच्या रोपात जास्तीचे पाणी राहत नाही, त्यामुळे रोपं कोमेजून जात नाही. 

कुंडीतल्या रोपांची माती बदलण्याची वेळ झाली कसं ओळखाल? लक्षात ठेवा २ गोष्टी-पाहा योग्य पद्धत...

तुळशीच्या रोपाची अधिक काळजी घेण्यासाठी तसेच दर १५ दिवसांनी पाण्यात हळद मिसळून असे पाणी तुळशीच्या रोपांवर आणि कुंडीत स्प्रे करुन घ्यावे. या उपायामुळे तुळशीच्या रोपाचा किडे, मुंग्या व इतर समस्यांपासून बचाव केला जाण्यास अधिक मदत होईल.

Web Title: Gardening Tips How Revive Dying Tulsi Plant How to Save Tulsi Plant from Dying in Winters How To Prevent Tulsi Plant From Dying Tips For Healthy Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.