Join us  

कुंडीत लावा आलं, ५ सोप्या गोष्टी- छोट्याशा कुंडीतही येईल भरपूर आलं! प्या गरमागरम आल्याचा चहा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2022 5:52 PM

Gardening Tips For Ginger: घरी उगवलेल्या ताज्या ताज्या आल्याचा सुगंध काही निराळाच.. म्हणूनच तर बघा हा एक छोटासा प्रयत्न करून आणि लावा घरी आलं...(How to grow ginger in pot)

ठळक मुद्देबागेतला छोटासा कोपरा किंवा एखादी छोटीशी कुंडी रिकामी असेल तर त्यात आलं लावण्याचा हा एक अतिशय सोपा प्रयोग करून बघाच.

रिमझिम बरसणारा पाऊस असो किंवा मग कडाक्याची थंडी. या दोन्ही ऋतुंमध्ये आलं घालून केलेला गरमागरम वाफाळता चहा (ginger tea) प्यायला मिळणं म्हणजे निव्वळ स्वर्गसुख...आता हे आलं जर आपल्या अंगणातल्या कुंडीत उगवलेलं असेल तर मग त्या चहाला येणारा सुवास आणखीनच खास असणार. शिवाय चहासाठीच नाही तर भाज्या आणि इतर वेगवेगळे पदार्थ आणखी चवदार होण्यासाठी आल्याची गरज पडतेच...म्हणूनच तर बागेतला छोटासा कोपरा किंवा एखादी छोटीशी कुंडी रिकामी असेल तर त्यात आलं लावण्याचा हा एक अतिशय सोपा प्रयोग करून बघाच. घरी उगवलेलं आलं पाहून तुम्ही नक्कीच हरखून जाणार.(How to grow ginger in terrace garden)

 

आलं खाण्याचे फायदे (Benefits of ginger)- कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आलं अतिशय उपयुक्त आहे.- आल्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं.- याशिवाय आल्यामधून झिंक, कॅल्शियम आणि लोह मोठ्या प्रमाणात मिळतं.- मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी आले उपयुक्त आहे.- पचनक्रिया सुधारण्यासाठी तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही आल्याची मदत होते.

 

कुंडीत कसे लावायचे आले?१. कुंडीत आलं लावण्यासाठी कोणत्याही बियाणाची गरज नाही. तुमच्या घरात असलेला आल्याचा तुकडा त्यासाठी उपयोगी आहे.२. आल्याचा जो तुकडा रोपटं लावण्यासाठी वापरणार आहात तो थोडा जुना असावा. एकदम ताजा नको.३. कारण जुन्या आल्याच्या तुकड्यावर ग्रोथ बड्स म्हणजेच बोली भाषेत आपण त्यांना आल्याचे डोळे म्हणतो, ते व्यवस्थित  दिसून येतात. ४. आलं लावण्यासाठी माती खूप चिकट किंवा पाणी खूप अधिक धरून ठेवणारी नको.५. कुंडीतली थोडीशी माती हातानेच बाजूला करून घ्या आणि त्यामध्ये आल्याचा साधारण दिड ते २ इंच तुकडा टाका. असं करताना आल्याचे डोळे वरच्या बाजूला असतील याची काळजी घ्या. आता त्यावर वरून पुन्हा थोडी माती टाकून द्या.

६. आल्याच्या रोपट्याला खूप जास्त पाणी घालू नये. माती सुकलेली दिसली की तेव्हाच फक्त वरून थोडे पाणी द्यावे. तसेच हे रोपटे भरपूर ऊन येणाऱ्या जागी ठेवावे. ७. साधारण २१ ते २५ दिवसांनी कुंडीत पाने उगवलेली दिसतील. हळूहळू हे राेपटे भरपूर वाढते.८. हे रोपटे जेव्हा ३ ते ४ महिन्यांचे होईल आणि त्याची पाने पिवळट पडून सुकलेली दिसू लागतील, तेव्हा आलं काढून घेण्याची वेळ झाली आहे, हे समजावे.९. गरजेनुसार एक एक फांदी जमिनीतून काढावी आणि त्याला लागलेला आल्याचा कंद तोडून घ्यावा. १०. एकदा लावल्यानंतर हे रोपटे आपोआप वाढत जाते. त्यासाठी विशेष काही करण्याची गरजच पडत नाही. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सगच्चीतली बागइनडोअर प्लाण्ट्सपाणी