घराच्या अवतीभवती फुलांची झाडं असती असतील तर घराचे सौंदर्य अधिकच वाढते (Gardening Tips) आणि वातारवरणही सकारात्मक राहते. (How To Plant Roses At Home) उन्हाळ्याच्या दिवसांत रोपं सुकतात, पानं पिवळी पडतात अशी तक्रार अनेकांची असते किंवा फक्त पानांची वाढ होते असे अनेकजणांचं म्हणणं असतं. (Gardening Tips) घरगुती खतांचा वापर करून तुम्ही बाग चांगली फुलवू शकता. फळांच्या खतांचा वापर करून तुम्ही गुलाब चांगले वाढवू शकता. (How to Grow Roses At Home)
कोणत्या फळांच्या सालीबाबत लिक्वीड फर्टिलायजर तयार करता येते
१) संत्र्याच्या सालीपासून लिक्विड फर्टिलायजर तयार करणं खूपच सोपं आहे. यामुळे पोषक तत्वांची कमतरता भरून निघते आणि फुलांची वाढही चांगली होते.
२) संत्र्याच्या सालीचे खत तयार करण्यासाठी सगळ्यात आधी संत्र्याची सालं छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. एका भांड्यात पाणी आणि संत्र्याची सालं घाला.
व्हिटामीन बी -१२ साठी स्वस्तात मस्त सुपरफूड, हाडं होतील मजबूत-शाकाहारींसाठी वरदान
३) त्यात तुम्ही गूळसुद्धा घालू शकता. मिश्रण थोडावेळ उकळू द्या त्यानंतर १० ते १५ मिनिटं शिजू द्या नंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या.
४) थंड झाल्यानंतर सालं काढून घ्या नंतर एका बॉटलमध्ये भरा. गुलाबाच्या रोपाला पाणी देताना लिक्विड खताचा वापर करा. २ ते ३ आठवड्यातून एकदा हे खत झाडांना द्या.
रोज चालता तरी पोट-मांड्या जाडजूड? किती पाऊल आणि कधी चालावं याचं सोपं गणित, मेंटेन व्हाल
५) हे लिक्विड खत गुलाबाच्या रोपासाठी फायदेशीर ठरते. ज्यामुळे रोपाला आवश्यक पोषक तत्व मिळतात. मातीची पाणी एब्जॉर्ब होण्याची क्षमता सुधारते. रोपांची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय फुलांची संख्या आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.