तुळशीचे फक्त धार्मिक महत्व नसून आरोग्याच्या दृष्टीनंही तुळशीचे बरेच फायदे आहेत. धरतीवरील लाभकारी औषधी जडीबूटींपैकी एक मानली जाते. तुळशीच्या काढ्याचे सेवन लोक सर्दी, खोकल्याच्या त्रासावर अधिकाधिक करतात. म्हणूनच घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत हे रोप लावायला हवं. (Gardening Tips)
तुळशीची खासियत अशी की हे रोप कुठेही सहज लावता येतं. ऊन्हाळ्याच्या दिवसांत तुळशीचे रोप कोमेजण्याचा धोका असतो. पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यातसुद्धा ही समस्या जाणवते. काही टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुळशीला बहरलेलं ठेवू शकता. (How to Grow Tulsi Plant At Home)
तुळशीचे रोप सुकल्यासारखे वाटेल तेव्हाच त्यात पाणी घाला. कारण हिवाळा आणि पावसाळ्यात तुळशीत जास्त मॉईश्चर जमा होते. जर जास्त मॉईश्चर जमा झाले तर सुकी माती घालून तुम्ही बॅलेंन्स करू शकता. (How to Take Care Of Tulsi Plant At Home) जास्त मॉईश्चरमुळे तुळशीला बुरशी येऊ शकते. अशा स्थितीत तुळस चांगली ठेवण्यासाठी ही पावडर घाला ज्यामुळे संक्रमण रोखण्यास मदत होईल तुम्ही कडुलिंबाची पानंसुद्धा यात घालू शकता.
एशिया फार्मिंगच्या अहवालानुसार तुळशीच्या रोपाच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही त्यात केळ्याचे साल घालू शकता. यातून पोटॅशियम मिळेल. पोटॅशियममध्ये व्हायटल न्युट्रिएंट्स असतात. ज्यामुळे संपूर्ण रोपाची वाढ चांगली होते. माती चांगली राहते. कडुलिंबाच्या तेलाचा स्प्रे तुळशीवर मारल्यास बुरशी येत नाही आणि रोपाची चांगली वाढ होते. तुळशीमध्ये सल्फर पावडरचा वापरही तुम्ही करू शकता. एसिडीक मातीमुळे रोपाला पोषण मिळते. सल्फर पावडर शिंपडण्यासाठी तुळशीच्या बेसवर घाला.
थंड वातावरणात तुळशीला एकदम सकाळी पाणी घालणं टाळायला हवं. ज्यामुळे रोप सुकत नाही. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुळशीचे रोप बहरलेलं ठेवू शकता. तुळशीला बहरलेलं ठेवण्यासाठी तुम्ही यात शेणखत घाला. याव्यतिरिक्त चहा पावडरसुद्धा घालू शकता. इतकंच नाहीतर तुम्ही केळ्याच्या सालीपासून बनवलेले खतही तुळशीला घालू शकता. ज्यामुळे रोप सुकत नाही.