तुळशीचे रोप प्रत्येकाच्याच अंगणात असते. तुळशीचे रोप लावल्यानं घर, मन दोन्ही प्रसन्न राहतं आणि तुळशीचे अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा मिळतात (Gardening Tips). पण तुळस सुकते फक्त काड्या दिसतात अशी अनेकांची तक्रार असते. तुळस सुकू नये चांगली ढेरेदार व्हावी यासाठी तुळस लावण्यापासून ती वाढेपर्यंत काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. (How to Grow Tulsi Plant at Home Natural Fertilizer For Tulsi Plant)
तुळशीचं रोपं लावण्यासाठी एक मोठ्या आकाराची कुंडी घ्या. त्यात छिद्र करून छिद्रात दगड ठेवा. जेणेकरून ते छिद्र मातीनं बंद होणार नाही. नंतर माती तयार करावी लागेल. ज्यात ३० टक्के वर्मी कंपोस्ट, रेती घ्यावी लागेल. त्यात तुम्ही बगीच्यातील माती मिसळू शकता. नंतर रोप लावा. २ दिवस रोप सावलीत राहू द्या. त्यानंतर ज्या ठिकाणी ऊन येतं तिथे रोप ठेवा.
तुळशीचं रोप दाट होण्यासाठी काय करावं?
खेती टॉक्स. कॉमनुसार तुळशीचं रोप जास्त दाट असेल तर ते दिसायला फारच सुंदर दिसते आणि पानंसुद्धा जास्त असतात. त्यासाठी साधा सरळ उपाय असा की रोप लहान असतानाच कटींग करत राहा. वरच्या भागाला बोटांच्या मदतीनं तोडा. नंतर २ ते ३ वेळा वरचा भाग तोडा.
मेंदूवर हल्ला करतात पत्ता कोबीतील अळ्या; अटॅक येण्याचाही धोका, डॉक्टरांनी सांगितले उपाय
या कटिंगला 1g, 2g, 3g कटींग म्हणतात. तीन वेळा कटींग केल्यानंतर रोप बहारदार, दाट होईल. याव्यतिरिक्त तुम्हाला लक्ष ठेवावे लागेल की जेव्हा रोपाला मंजिरी येतात तेव्हा त्याचवेळी त्या काढून टाकाव्यात. तर तुम्हाला बिया हव्या असतील तर २ ते ४ दिवस राहू द्या नंतर काढून टाका अन्यथा रोप सुकू लागेल.
तुळशीचं रोप सुकत असेल तर काही घरगुती उपाय करायला हवेत ज्यामुळे रोप नेहमी बहरलेलं राहील.
तुळशीची पानं गळत असतील त सगळ्यात आधी पिवळं पाणी कुंडीत घालायला हवं हे पाणी तयार करण्यासाठी थोड्या मोहोरीच्या बिया घ्या. पिवळ्या मोहोरीच्या बिया तुम्ही घेऊ शकता.
१ ग्रॅम सोन्यात घ्या स्टोन पेंडंटचे मंगळसुत्र; पाहा रोज वापरण्यासाठी १० सुंदर, आकर्षक डिजाईन्स
छोटं रोप असेल तर एक मुठ घ्या. मोठं झाड असेल तर २ मुठ भरून घ्या. मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून त्यात ५ लिटर पाणी मिसळून रोपात घाला. माती सुकी असायला हवी. तेव्हाच पूर्ण पोषण मिळेल. काही दिवसांनी थोडी थोडी हिरवी पानं येऊ लागतील.
जेव्हा रोपाला हलकी पानं येऊ लागतील तेव्हा हे पाणी द्या. हे पाणी कडुलिंबाच्या काड्यांच्या मदतीनं तयार करू शकता. ज्यासाठी तुम्हाला ५ लिटर पाणी घ्यावं लागेल. त्यात १ मूठ किंवा ५० ग्रॅम कडुलिंबाच्या काड्या घालाव्या लागतील नंतर ४८ तास तसंच ठेवून द्या. त्यानंतर २ लिटर पाण्यात २५० एमएल काळं पाणी मिसळून रोपाच्या मुळांमध्ये घाला. ज्यामुळे रोप बहरलेलं राहील.