धार्मिक आणि आयुर्वेदीक दृष्टीने पाहायचे झाले तर तुळस महत्वपूर्ण मानली जाते. तुळशीला हिंदू धर्मात देवीची उपाधी देण्यात आली आहे. आयुर्वेदात तुळशीला क्विन ऑन हर्ब्स असंही म्हटलं जातं. अनेक वर्षांपासून तुळशीची पुजा केली जात आहे. संक्रमणापासून लढण्यासाठी तुळस फायदेशीर ठरते. तुळस व्यवस्थित वाढत नाही, पानं गळतात तर कधी पानं पिवळी पडतात. फक्त काड्याच दिसतात अशी अनकांची तक्रार असते.(How To Grow Tulsi Plant At Home)
पण अनेकजणांचे असे म्हणणे असते की तुळस लावल्यानंतर ती कोमेजते. कितीही पाणी घातलं तरी तुळस चांगली राहत नाही. काही घरगुती उपाय करून तुम्ही तुळस दीर्घकाळ बहरलेली ठेवू शकता तुळशीच्या रोपाची कशी काळजी घ्यायची ते पाहू. काही घरगुती उपाय तुळस चांगली वाढण्यासाठी फायदेशीर ठरतील.
अर्बन माळीच्या रिपोर्टनुसार तुळशीला ६ तासांच्या सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते. ज्यामुळे तशाच जागेची निवड करा, तुळशीचा कुंडींच्या आकारानुसार मंजिरी किंवा बियाणे पेरा, तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घाला. पाणी घालणं ही महत्वाची पायरी आहे (Ref). दर २ वर्षांनी रोपाची कुंडी आणि जागा बदलत राहा. तुळशीची सुकलेली पानं काढत राहा. तुळशीचं रोप सुकण्याची अनेक कारणं असू सकतात जसं की गरजेपेक्षा जास्त पाणी, खत घालणं, कमी ऊन मिळणं, याव्यतिरिक्त किडे लागणं यामुळे तुळशीचं रोप सुकू लागतं.
तुळशीचं रोपं लावण्याआधी त्याच्या मातीकडे लक्ष द्या. नेहमी अशा मातीची निवड करा ज्यात ३० टक्के रेती असेल. याव्यतिरिक्त जास्त पाणी घातल्यामुळे तुळशीला बुरशी येऊ शकतं. यासाठी तुळस लावताना त्यात ७० टक्के माती आणि ३० टक्के रेती असायला हवी. ज्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत तुळशीला बुरशी येणार नाही चांगली बहरेल.
गाईचे शेण आणि कडुलिंबाची पांन या रोपांसाठी उत्तम मानले जातात. तुम्ही खताच्या स्वरूपात याचा वापर करू शकता. पण रोपांमध्ये शेण खत घालाताना इतकं लक्ष द्या की शेण जास्त ओलं असू नये. शेण नेहमी सुकवून पावडरप्रमाणे तुळशीत घाला. कडूलिंबाची पानं सुकवून याची पावडर रोपांमध्ये घातल्यास रोपांची चांगली वाढ होते.
नेहमी अशा कुंडीत रोप लावा जे जास्त खोल आणि मोठं असेल. पॉटमध्ये 2 छिद्र पाडायला विसरू नका. नंतर हे छिद्र एका कागदावर ठेवा. तुम्ही यात जिप्सम सॉल्टचा वापर करू शकता. यासाठी 1 लिटर पाण्यात 1 चमचा जिप्सम सॉल्ट मिक्स करा. त्यानंतर हे पाणी रोपांवर शिंपडा. रोप लावल्याच्या 20 ते 25 दिवसांनंतर हे शिंपडा. तुळशीच्या रोपाची कापणी करत राहायला हवं म्हणजेच वेळोवेळी पानं तोडत राहायला हवीत.