Lokmat Sakhi >Gardening > पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरून जाईल बाग, फक्त ३ गोष्टी करा... बागेत नेहमीच वेगवेगळे पक्षी येतील

पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरून जाईल बाग, फक्त ३ गोष्टी करा... बागेत नेहमीच वेगवेगळे पक्षी येतील

How To Attract Birds To Your Garden?: पक्ष्यांचा किलबिलाट आपल्या छोट्याशा बागेतून किंवा टेरेस गार्डनमधून ऐकू आला की मनातून वेगळाच आनंद होतो....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 09:12 AM2024-04-26T09:12:59+5:302024-04-26T09:15:02+5:30

How To Attract Birds To Your Garden?: पक्ष्यांचा किलबिलाट आपल्या छोट्याशा बागेतून किंवा टेरेस गार्डनमधून ऐकू आला की मनातून वेगळाच आनंद होतो....

Gardening Tips: How to make your little terrace garden bird friendly? how to attract birds to your garden?  | पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरून जाईल बाग, फक्त ३ गोष्टी करा... बागेत नेहमीच वेगवेगळे पक्षी येतील

पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरून जाईल बाग, फक्त ३ गोष्टी करा... बागेत नेहमीच वेगवेगळे पक्षी येतील

Highlightsयासाठी काही आठवड्यांचा वेळ नक्कीच द्यावा लागेल. तोपर्यंत संयम ठेवा. कारण एकदा पक्ष्यांना तुमच्या बागेचा पत्ता समजला की त्यानंतर ते नेहमीच येऊ लागतील. 

बागेतली हिरवीगार रोपं, फुलांनी- कळ्यांनी बहरून आलेली वेल असं सगळं बागेत पाहिलं की मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते. रखरखत्या उन्हातही त्या बागेकडे नुसतं पाहिलं तरी मनाला आणि शरीराला एक प्रकारचा थंडावा मिळाल्यासारखा वाटतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जेव्हा आपल्या या छोट्याशा बागेतून वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो, तेव्हा तर एक वेगळाच आनंद होतो (How to make your little terrace garden bird friendly?). भर उन्हाळ्यातही तुम्हाला तुमच्या बागेतून येणारा पक्ष्यांचा असाच चिवचिवाट, किलबिलाट ऐकायचा असेल तर बागेत काही छोटे- छोटे बदल करा.. बघा वेगवेगळे पक्षी तुमच्या बागेच्या भेटीला नक्कीच येऊन जातील. (How To Attract Birds To Your Garden?)

बागेत किंवा टेरेसगार्डनमध्ये पक्षी येण्यासाठी उपाय

 

१. झाडांची निवड

आपल्या बागेत पक्ष्यांनी काही वेळ यावे. एका रोपावरून दुसऱ्या रोपावर अलगदपणे जावे, जाता जाता मस्त चिवचिवाट करावा असं वाटत असेल तर बागेतल्या रोपांची निवड तुम्हाला थोडी काळजीपुर्वक करावी लागेल. कारण पक्षी वेगवेगळ्या इंग्लिश झाडांपेक्षा आपल्या परिसरातील पारंपरिक रोपांकडेच जास्त ओढ घेतात. त्यामुळे तुमच्या बागेत जास्वंद, गुलाब, झेंडू, मोगरा, मधुकामिनी, मधुमालती अशी पारंपरिक रोपं जास्त असू द्या. तसेच गार्डनमधल्या कुंड्याही खूप भडक, चमकदार रंगाच्या घेऊ नका. 

 

२. दाणा- पाण्याची व्यवस्था

जिथे पक्ष्यांना खायला आणि पाणी प्यायला मिळेल, तिथे पक्षी हमखास येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी तुमच्या बागेत दोन- तीन ठिकाणी पक्ष्यांच्या सहज दृष्टीत पडेल अशा पद्धतीने ताटल्या ठेवा आणि त्यात धान्याचे दाणे, फळांचे तुकडे करून टाका. सोबतच एका भांड्यात पाणीही ठेवा. हे पाणी दररोज बदलून स्वच्छ करा. धान्याची ताटली आणि पाण्याचे भांडे कुठेतरी लटकावून ठेवले तरी चालेल.

 

३. घरटे आणा

तुमच्या बागेच्या एका कोपऱ्यात पक्ष्यांसाठी घरटे लटकावून ठेवा. ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा तुमच्या शहरातल्या नर्सरीमधूनही तुम्ही ते खरेदी करू शकता. त्या घरट्याच्या आजुबाजूला पक्ष्यांसाठी खाण्यापिण्याचे साहित्य ठेवा. घरटं किंवा पक्ष्यांसाठी दाणा- पाणी ठेवल्यानंतर ते लगेचच तुमच्या बागेत येणार नाहीत. यासाठी काही आठवड्यांचा वेळ नक्कीच द्यावा लागेल. तोपर्यंत संयम ठेवा. कारण एकदा पक्ष्यांना तुमच्या बागेचा पत्ता समजला की त्यानंतर ते नेहमीच येऊ लागतील. 

 

Web Title: Gardening Tips: How to make your little terrace garden bird friendly? how to attract birds to your garden? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.