काही जणांना गार्डनिंगची खूप हौस असते. पण घराभोवती मोठी जागा नसल्याने किंवा मग जमिनीवरचं घर नसल्याने ही आवड जोपासता येत नाही. काही झाडं किंवा रोपटी जमिनीवरच लावावीत, जेणेकरून ती चांगली वाढतात, असा आपला एक समज असतो. लिंबाच्या झाडाच्या बाबतीतही अनेक लोक असाच विचार करतात. पण एका मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये लिंबाचं रोपटंही व्यवस्थित लावता येतं (How to Plant Lemon or Lime Tree In a Pot) आणि विशेष म्हणजे त्याला चांगली लिंबही येतात. यासाठी कसं रोपटं तयार करायचं आणि त्याची कशी काळजी घ्यायची, याविषयीचा हा व्हिडिओ.(Garden hacks for lime tree)
लिंबाचं रोप कसं लावायचं?१. घरच्याघरी लिंबूमधील बियांचा वापर करून रोपटं कसं तयार करायचं आणि ते झाड कसं वाढवायचं याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या creative_explained या पेजवर शेअर करण्यात आला आहे. गार्डनिंगची आवड असल्यास हा प्रयोग एकदा करून बघा.
उशांवर डाग पडले, खराब झाल्या? न धुताही होतील स्वच्छ... करून बघा ३ सोपे उपाय
२. यासाठी लिंबू कापा आणि त्यामधल्या एक- दोन बिया एक ग्लासभर पाण्यात ५ ते ६ तासांसाठी भिजत ठेवा.
३. बिया चांगल्या भिजल्या की त्या पाण्याबाहेर काढा. व्यवस्थित पुसून घ्या आणि चाकूच्या मदतीने बियांचे पुढचे टाेक अलगद कापून घ्या. त्यानंतर बी फोडून घ्या आणि त्याच्या आतमध्ये जी आणखी लहान बी आहे ती एका छोट्याशा कुंडीत मातीमध्ये खोचून ठेवा. वरतून थोडंसं पाणी घाला. माती ओलसर राहील एवढंच पाणी द्यावं.
४. यानंतर जिथे बी खोचलेली आहे, त्या भागावर एक काचेचा ग्लास उलटा करून ठेवा. जेणेकरून रोपट्यासाठी आवश्यक असणारी उष्णता निर्माण होईल.
५. ५ ते ६ दिवसांत बियांना अंकूर फुटेल.
भरपूर भाज्या घालून केलेली चवदार पौष्टिक दलिया खिचडी, थंडीत करावाच असा गरमागरम बेत
६. जेव्हा या रोपट्याला चांगली १०- १२ पानं येतील, तेव्हा ते एखाद्या मोठ्या कुंडीत लावा.
७. वेळोवेळी खत आणि योग्य प्रमाणात पाणी दिलं की रोपटं मोठं होऊन चांगली लिंबं देऊ लागेल.