बऱ्याच भाज्यांमध्ये, वरणामध्ये, चटणीमध्ये कडीपत्त्याचा छानसा खमंग तडका दिला की त्या पदार्थाला एक वेगळाच स्वाद येतो. तो पदार्थ अधिक चवदार होतो. त्यामुळे स्वयंपाक घरात हमखास लागणाऱ्या कडीपत्त्याचं रोपटं आपल्या अंगणात किंवा बाल्कनीत फुलविण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. पण बऱ्याच जणांकडे खूप प्रयत्न करूनही हवा तसा कडीपत्ता फुलतच नाही. लगेच सुकून जातो किंवा नीट वाढत नाही किंवा मग त्यावर अळी पडते आणि तो सुकतो. तुमच्याही घरच्या कडीपत्त्याचं असंच होत असेल, तर नेमकं काय चुकतंय हे एकदा बघाच... (How to take care of curry leaves plant or kadhi patta plant?)
कडीपत्त्याच्या रोपाची काळजी कशी घ्यायची?
१. ऊन किती मिळते?
कडीपत्त्याच्या रोपट्याची विशेष काळजी घ्यावी लागत नाही, हे अगदी खरं आहे. पण त्याच्या रोपट्याला भरपूर ऊन मिळेल, याकडे विशेष लक्ष मात्र द्यावे लागते.
आयशॅडो न वापरता डोळ्यांचा करा सुंदर मेकअप, खास बिगिनर्ससाठी ४ सोप्या टिप्स, डोळे दिसतील टपोरे- सुंदर
कडीपत्त्याचं रोपटं सारखं सुकत असेल तर त्याला पुरेसं ऊन मिळतंय की नाही हे एकदा तपासा. कडीपत्त्याला ६ ते ७ तास चांगलं कडक ऊन लागलं पाहिजे.
२. पाणी किती द्यायचं?
कडीपत्त्याच्या रोपट्याला खूप जास्त पाणी आणि खत घालण्याची गरज नसते.
पाळी सुरु होताना आणि त्या ४ दिवसांतही पोट खूप दुखतं? प्या हा खास काढा, मिळेल आराम
हिवाळ्यात अगदी रोज पाणी दिले नाही तरी चालते. कुंडीतली माती कोरडी झाली आहे का हे बघावे आणि मगच कडीपत्त्याला पाणी घालावे. गरजेपेक्षा जास्त पाणी झाले तर कडीपत्ता सुकतोच.
३. वारंवार छाटणी
तुमच्या घरच्या कडीपत्त्याच्या रोपट्याला व्यवस्थित ऊन मिळतेय, पाणी घालतानाही तुम्ही योग्य ती काळजी घेत आहात, तरीही रोपटं फुलत नसेल तर अशा परिस्थिती त्या रोपट्याची एकदा छाटणी करा.
कडीपत्त्याच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी त्याची वारंवार छाटणी करणं गरजेचं असतं.