Lokmat Sakhi >Gardening > तुळस वाळून गेली? पुन्हा येईल बहरून- होईल हिरवीगार, करा १ सोपा उपाय...

तुळस वाळून गेली? पुन्हा येईल बहरून- होईल हिरवीगार, करा १ सोपा उपाय...

Gardening Tips How to Take Care of Tulsi Basil Plant at Home : सुकलेली तुळस पुन्हा बहरण्यासाठी काय करायचं याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 05:25 PM2022-11-15T17:25:16+5:302022-11-15T17:36:33+5:30

Gardening Tips How to Take Care of Tulsi Basil Plant at Home : सुकलेली तुळस पुन्हा बहरण्यासाठी काय करायचं याविषयी...

Gardening Tips How to Take Care of Tulsi Basil Plant at Home : Did the basil wilt? It will bloom again - it will be green, do 1 simple solution... | तुळस वाळून गेली? पुन्हा येईल बहरून- होईल हिरवीगार, करा १ सोपा उपाय...

तुळस वाळून गेली? पुन्हा येईल बहरून- होईल हिरवीगार, करा १ सोपा उपाय...

Highlightsहा उपाय फारसा खर्चिक आणि अवघड नसल्याने आपण घरच्या घरी अगदी सहज करु शकतो.तुळस आपण देवाला वाहण्यासाठी, औषधी गुणधर्म असल्याने काढ्यासाठी किंवा अगदी चहामध्ये घालण्यासाठीही वापरु शकतो. 

आपल्या घरात बाग, छोटसं होम गार्डन नसलं तरी एक झाड आवर्जून असतं ते म्हणजे तुळस. धार्मिक महत्त्व असलेली ही तुळस न चुकता घराघरांत लावली जाते. तुळशीला रोज पाणी घातलं की ती येत राहते. तिच्याकडे इतर झाडांप्रमाणे फारसं लक्ष द्यावं लागत नाही. हे जरी खरं असलं तरी कधी कधी ही तुळसही अचानक वाळून जायला लागते. एकदा तुळस वाळायला लागली की तिला पुन्हा बहर यायला वेळ लागतो. त्यामुळे सुकलेली तुळस पुन्हा बहरण्यासाठी काय करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी आज आपण एक सोपा उपाय पाहणार आहोत (Gardening Tips How to Take Care of Tulsi Basil Plant at Home). 

(Image : Google)
(Image : Google)

काही वेळा तुळशीला एखादे फंगल इन्फेक्शन होते तर काही वेळा ही तुळस पार सुकून जाते. काहीवेळी प्रदूषणामुळेही तुळशीचं रोप वाळून जातं. मात्र तुळस सुकली तरी ती लगेच परत येऊ शकते. यासाठी काय उपाय करायला हवा ते आपण आज पाहणार आहोच. कडुलिंबाच्या पानांची पावडर हा तुळशीचे वाळलेले रोप पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. यासाठी कडुलिंबाची पानं उन्हात वाळवून घ्यावीत. ती सुकली की मिक्सरमधे वाटून घ्यावीत आणि केवळ दोन चमचे कडुलिंबाची पावडर तुळशीला घालावी. 

(Image : Google)
(Image : Google)

आता कडुलिंबाची पावडर रोपाला घालायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर कुंडीतील माती १५ ते २० सेंटीमीटरपर्यंत उकरावी. त्यामध्ये ही पावडर घालावी आणि वरुन पुन्हा माती आहे तशी घालून टाकावी. मग या रोपाला नियमित पाणी घालत राहावे. कडुलिंबाची पावडर मुळांमध्ये शोषली गेल्याने काही दिवसातच तुळशीला हिरवीगार पानं फुटलेली दिसतात. कडुलिंबामध्ये असणारे औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे चांगले असतात त्याचप्रमाणे ते तुळशीसाठीही फायदेशीर ठरतात. तसेच हा उपाय फारसा खर्चिक आणि अवघड नसल्याने आपण घरच्या घरी अगदी सहज करु शकतो. तुळस आपण देवाला वाहण्यासाठी, औषधी गुणधर्म असल्याने काढ्यासाठी किंवा अगदी चहामध्ये घालण्यासाठीही वापरु शकतो. 

Web Title: Gardening Tips How to Take Care of Tulsi Basil Plant at Home : Did the basil wilt? It will bloom again - it will be green, do 1 simple solution...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.