उन्हाचा पारा आता सगळीकडेच वाढायला लागला आहे. दुपारच्यावेळी घराबाहेर पडायलाही अक्षरश: नको वाटते आहे. घरातही खूप उकडते आहे. अशावेळी आपल्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण जशी स्वत:ची काळजी घेतो, तशीच काळजी आपल्या बाल्कनीतल्या, अंगणामधल्या रोपांची घेणंही गरजेचं असतं. कारण उन्हाचा कडाका एका मर्यादेच्या बाहेर गेला की त्यांनाही तो सोसवणं कठीण जातं. त्यामुळेच तर उन्हाच्या झळा वाढू लागल्या की बागेतली अनेक रोपं सुकू लागतात. त्यापैकीच एक आहे तुळस (gardening tips how to take care of tulsi plant in hot summer). ऊन वाढताच तुमच्याही अंगणातली तुळस सुकू लागली असेल, तिच्या पानांचा आकार लहान होऊ लागला असेल तर हे काही सोपे उपाय करून पाहा..(simple home hacks to maintain tulsi plant in summers)
उन्हाळ्यात तुळस सुकू नये म्हणून काय उपाय करावे?
१. तुळशीवर आच्छादन टाका
तुळशीला भरपूर सुर्यप्रकाश हवा असतो. त्यामुळे आपण सहसा तिची जागा अशीच ठेवलेली असते जिथे तिला पुरेसं ऊन मिळेल. पण उन्हाळ्यात उन्हाचा कडाका खूप जास्त वाढलेला असल्याने तिला तो सहन हाेत नाही.
टॉयलेट सीटवर पडलेले पिवळे डाग २ मिनिटांत निघून जातील! 'हा' पदार्थ वापरून करा स्वच्छता
त्यामुळे मार्च, एप्रिल, मे असे तीन महिने तुळशीची जागा थोडी बदलून पाहा. २ ते ३ तास तिला चांगलं ऊन मिळेल अशा ठिकाणी तिला ठेवा. जर जागा बदलणे शक्य नसेल तर तिच्या भोवती काड्या रोवून त्यावर एखादा कपडा टाका आणि तिच्यावर आच्छादन घाला. यामुळे उन्हापासून तिचा बचाव होईल.
२. पाणी द्या
तुळशीच्या रोपाला उन्हाळ्यात पाणी घालायला अजिबात विसरु नका. कारण तुळशीची वाढ तेव्हाच चांगली होते जेव्हा तिला योग्य प्रमाणात पाणी घातलं जातं. सकाळी तुळशीला पाणी घालण्याची सवय असेल तर तेव्हा नक्की घाला. पण संध्याकाळीसुद्धा पाणी घाला.
भात- खिचडीसारखे आवडते पदार्थ वजन वाढेल म्हणून खाणं टाळता? बघा हे कितपत खरं
कारण सकाळी पाणी घातलं तरी माती उन्हामुळे लगेच कोरडी पडते. त्याउलट संध्याकाळी पाणी घातल्यास माती जास्त वेळ ओलसर राहाते. केळीची सालं, कांद्याची टरफलं ८ ते १० तास पाण्यात भिजवून ते पाणीही अधूनमधून तुळशीला घाला. चांगली वाढ होईल.