Lokmat Sakhi >Gardening > घरात दोन-चार तरी रंगबिरंगी रोपं लावायला हवीत! ३ फायदे, बदलून जाईल जगणं.. ‘एवढं’ करा..

घरात दोन-चार तरी रंगबिरंगी रोपं लावायला हवीत! ३ फायदे, बदलून जाईल जगणं.. ‘एवढं’ करा..

Gardening Tips Know How Plants Play Important Role in Life : ण गरजेप्रमाणे घरात अनेक वस्तू, फर्निचर किंवा काहीबाही घेतो. पण आपल्या मनाला फ्रेश वाटावं, आपला मूड छान राहावा यासाठी घराचा एखादा कोपरा आवर्जून सजवायला हवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 05:15 PM2022-11-30T17:15:17+5:302022-11-30T17:17:03+5:30

Gardening Tips Know How Plants Play Important Role in Life : ण गरजेप्रमाणे घरात अनेक वस्तू, फर्निचर किंवा काहीबाही घेतो. पण आपल्या मनाला फ्रेश वाटावं, आपला मूड छान राहावा यासाठी घराचा एखादा कोपरा आवर्जून सजवायला हवा...

Gardening Tips Know How Plants Play Important Role in Life : At least two or four colorful plants should be planted in the house! 3 benefits, life will change.. Do this.. | घरात दोन-चार तरी रंगबिरंगी रोपं लावायला हवीत! ३ फायदे, बदलून जाईल जगणं.. ‘एवढं’ करा..

घरात दोन-चार तरी रंगबिरंगी रोपं लावायला हवीत! ३ फायदे, बदलून जाईल जगणं.. ‘एवढं’ करा..

Highlightsछानशी रोपं आणून त्यांच्यासाठी कुंड्यांची सजावट केले तर आपल्याला फ्रेश वाटते. कोपऱ्यात एखादे छानसे रोप आणून ठेवल्यास नक्कीच त्याठिकाणी कोणी काहीच पसारा करणार नाही.

आपल्या घरात फर्निचर, स्वयंपाकघरातील आवश्यक गोष्टी, सजावटीच्या गोष्टी असं सगळं असतं. आवश्यकता म्हणून किंवा घर छान दिसावं म्हणून आपण या सगळ्या गोष्टी अतिशय आवडीने जमवलेल्या असतात. त्यातच आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीला थोडी का होईना जागा असायला हवी, ती म्हणजे रोपांना. आपण गरजेप्रमाणे घरात अनेक वस्तू, फर्निचर किंवा काहीबाही घेतो. पण आपल्या मनाला फ्रेश वाटावं, आपला मूड छान राहावा यासाठी आपण घराचा एखादा कोपरा सजवतोच असं नाही. रोजच्या धावपळीत आपण इतके थकून जातो की सुट्टीच्या दिवशी घरात हातात कॉफीचा मग घेऊन निवांत बसून राहावं असं आपल्याला वाटतं (Gardening Tips Know How Plants Play Important Role in Life). 

(Image : Google)
(Image : Google)

अशावेळी ही जागा रंगबिरंगी आणि हॅपनिंग असेल तर? आता यासाठी काय करायचं असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. तर गॅलरीत, खिडकीच्या ग्रीलमध्ये किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यातही आपण काही रोपांना, फुलझाडांना थोडी जागा करुन देऊया की. या झाडांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, त्यांची मशागत कोण करणार अशी कारणं देऊन आपण खूप मोठ्या आनंदापासून स्वत:ला दूर ठेवतो. पण आजकाल फारसा मेंटनन्स न लागणारी, सहज कॅरी करता येतील अशी खूप छान रोपं मिळतात.  घरात त्यांच्यासाठी एक छोटा कोपरा राखून ठेवल्यास ही छोटीशी गोष्ट आपल्या आयुष्यात नक्कीच आनंद आणणारी ठरु शकते. आता हे केल्याने नेमके काय फायदे आणि बदल होतील तर पाहूया..

१. मूड फ्रेश राहण्यास मदत 

फुलांची किंवा शोभेची रोपं अतिशय छान अशा आकर्षक रंगांची आणि आकारांची असतात. वेगवेगळ्या आकाराच्या, डिझाईन्सच्या कुंड्यामध्ये ही रोपं लावल्यास आपल्याला सकाळी उठल्यावर त्यांच्याकडे पाहून फ्रेश वाटू शकते. इतकेच नाही तर दिवसभर आपण खूप थकून घरी आलो आणि ही रोपं छान आनंदानं डुलत असतील तरी आपला मूड फ्रेश होण्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. हल्ली पाण्याची आवश्यकता नसणारी, मातीशिवाय राहणारी अशी बरीच शोभेची रोपंही बाजारात मिळतात. घरात एखाद्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या कोपऱ्यांत ही रोपं ठेवल्यास सगळ्यांचाच मूड बदलण्यास मदत होईल.

(Image : Google)
(Image : Google)

२. मनासोबतच घरही सजेल छान

घरात काहीवेळा आपण एखादा कोपरा दिसला की त्याठिकाणी वस्तू रचून ठेवतो. इतकेच नाही तर काही ना काही कारणांनी हे कोपरे धुळीने, कपड्यांनी अस्ताव्यस्त दिसतात. अशावेळी या कोपऱ्यात एखादे छानसे रोप आणून ठेवल्यास नक्कीच त्याठिकाणी कोणी काहीच पसारा करणार नाही. पर्यायाने घर तर स्वच्छ राहीलच पण हा कोपराही छानशा एखाद्या रोपाने, कुंडीने सजून जाईल. छानसा वेल असेल तर तोही अशाठिकाणी मस्त दिसू शकेल.

३. वेळ जाण्याचे उत्तम माध्यम

अनेकदा आपण ऑफीसचे ताण, घरातील कामे, बाकीच्या गोष्टींचे टेन्शन असे घेऊन थकून जातो. अशावेळी आपल्याला काहीतरी छान आणि वेगळे करायचे असते. वीकेंडला थोडा मोकळा वेळ मिळाला की आपल्या हातात मोबाईल असतो नाहीतर आपण साफसफाई करत असतो. अशावेळी आपण छानशी रोपं आणून त्यांच्यासाठी कुंड्यांची सजावट केले तर आपल्याला फ्रेश वाटते. या रोपांची कापणी करणे, त्यांना खत घालणे, त्यांना प्रेमाने कुरवाळणे असे केल्यास ही रोपं आणखी जोमाने वाढतात आणि खुलून येतात. याबरोबरच आपला वेळही छान जातो आणि नकळत मूड फ्रेश होतो ते वेगळेच. 
 

Web Title: Gardening Tips Know How Plants Play Important Role in Life : At least two or four colorful plants should be planted in the house! 3 benefits, life will change.. Do this..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.