घरात सकारात्मक उर्जा राहण्यासाठी आपण नेहमीच विविध प्रयत्न करतो, त्यापैकी मनी प्लांटचे (Money plant) रोपटे लावणे हा एक प्रमुख प्रयत्न आहे. मनी प्लांट लावल्याने घरात सुखसमृद्धी येते अशी भारतीयांची धारणा आहे. संपत्तीत वाढ होते. घरातील हवा आणि वातावरणही शुद्ध होते. यामुळेच बहुतेक लोक आपल्या घराच्या बाल्कनीत आणि अंगणात मनी प्लांट लावतात. (Money plant benefits)
लोकांचा असा समज आहे की मनी प्लांट लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहते. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट योग्य दिशेने आणि जागी लावला नाही तर नुकसानही होऊ शकते. (Money plant care) मनी प्लांट चुकीच्या दिशेने असेल तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आम्ही तुम्हाला मनी प्लांट कोणत्या दिशेला लावणे योग्य ठरतं याबाबत सांगणार आहोत.
मनी प्लांट कोणत्या दिशेला लावायला हवं?
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही ईशान्य दिशेला लावू नये. वास्तविक ईशान्य दिशा ही सर्वात नकारात्मक मानली जाते. या दिशेला मनी प्लांट लावल्यास नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. पैशांसोबतच मनी प्लांटही नात्यात गोडवा आणण्याचे काम करते. त्यामुळे पूर्व-पश्चिम दिशेलाही लावू नये. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.
कोमेजलेली पानं नेहमी काढून टाका
मनी प्लांटचे रोप कधीही सुकू देऊ नका, त्याला हिरवे ठेवणे नेहमीच चांगले असते. यासाठी रोपाला रोज पाणी देत राहा. जर पाने कोमेजली तर त्यांची ताबडतोब छाटणी करा. वाळलेल्या पानांचा नकारात्मक परिणाम होतो. याशिवाय मनी प्लांटच्या वेली जमिनीवर कधीही पसरवू नयेत हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हे देखील घरातील अनेक नकारात्मकतेचे कारण असू शकते.
फक्त गॅस झाल्यानं नाही तर 'या' कारणांमुळे रोज सकाळी पोट साफ व्हायला त्रास होतो; जाणून घ्या उपाय
घरात मनी प्लांट लावणं कितपत योग्य?
मनी प्लांट कधीही घराबाहेर लावू नये. मनी प्लांट घरामध्ये लावल्यानेच या वनस्पतीचा फायदा होतो. तथापि, रोपाची योग्य दिशेने लागवड करणे महत्वाचे आहे. मनी प्लांटच्या आजूबाजूला घाण होऊ देऊ नका, पर्यावरण नेहमी स्वच्छ ठेवा.
जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढवतात रोजच्या जेवणातील 'हे' 2 पदार्थ; समोर आला आश्चर्यकारक रिपोर्ट
मनी प्लांट कुठे लावायला हवं?
मनी प्लांट लावण्यासाठी दक्षिण-पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते. मनी प्लांट या दिशेला लावल्याने सुख-समृद्धी मिळते. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते घरात, अंगणात कुठेही सहज लावता येते. हे फक्त पाण्यातच लावले जाऊ शकते आणि त्याच्या देखभालीसाठी देखील जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. मनी प्लांट अशा ठिकाणी ठेवावा जेथे जास्त सूर्यप्रकाश नसेल. तसेच आठवड्यातून एकदा त्याचे पाणी बदलावे.