बाहेरचं वातावरण आज अनेक कारणांमुळे प्रदूषित झालं आहे. प्रदूषणामुळे गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आज दवाखान्यात जाणारे अनेक रुग्ण हे केवळ प्रदूषणाच्या घातक परिणामांमुळे आजारी पडलेले असतात. प्रदूषणामुळे रोगप्रतिकारशक्तीही कमी होत आहे. घराबाहेरचं प्रदूषण आपण एकटे रोखू शकत नाही हे खरं पण आपलं घर प्रदूषणमुक्त होण्यासाठी मात्र आपण नक्कीच प्रयत्न करु शकतो.
आज बाहेर होणारी वृक्षतोड प्रदूषण वाढण्याला कारणीभूत ठरत आहे. झाडं छोटी असो की मोठी त्यांच्यात वातावरणावर परिणाम करण्याची ताकद प्रचंड असते. आज हीच ताकद कमी होत आहे. पण आपण याच झाडांची मदत घेऊन घरातलं वातावरण शुध्द ठेवू शकतो.
दारं खिडक्या बंद केल्या आणि घर स्वछ ठेवलं म्हणजे घरात प्रदूषणाचा धोका नसतो असं नाही. वातावरणातील घातक वायूचं अस्तित्त्व घरातही असतं. हे अस्तित्त्व घालवण्यासाठी काही झाडं परिणामकारक असतात. म्हणूनच घरात कोणती झाडं लावावीत हे समजून घेणं गरजेचं आहे.
घरातील प्रदूषण घालवणारी झाडं
Image: Google
1. बाम्बू पाम- ही वनस्पती घरातली हवा शुध्द ठेवते. ही वनस्पती छोट्याशा कुंडीत घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे ठेवता येतं. ही वनस्पती वातावरणातील फॉर्मेल्डिहाइड, ट्राइक्लोरोएथिलीन आणि बेंजीन सारखे विषारी वायू शोषून घेते.
Image- Google
2. स्नेक प्लाण्ट- ही वनस्पती हवेतील फॉर्मलाडेहाइड, टोल्यूनी, नायट्रोजन डायऑक्साइड हे विषारी वायू शोषून घेते. ज्यांना डोकेदुखी, रात्री झोप नीट न लागणे या समस्या असतात त्यांनी तर आपल्या घरात ही वनस्पती अवश्य लावावी.
Image: Google
3. अरेका पाम- हवा शुध्द करण्यात या वनस्पतीचा दर्जा सर्वात उच्च आहे. अरेका पाम हवेतील फार्मेल्डिहाइड, कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड यासारखे विषारी गॅस घालवून शुध्द ऑक्सिजन पुरवतं. ही वनस्पती घरात किंवा घराच्या आजूबाजूला लावली तर घरात येणारी हवा शुध्द होते.
Image: Google
4. स्पाइडर प्लाण्ट- ही वनस्पती हवेतील कार्बनचं प्रदूषण शोधून काढते. हवेतील बेंजीन फार्मल्डाहेहाइड, कार्बन मोनोऑक्साइड आणि जाइलिन सारखी दुषित घटक शोषून घेते. म्हणून घरात स्पाइडर प्लाण्ट असणं गरजेचं आहे.
Image: Google
5. कोरफड- सहज उगणारी वनस्पती म्हणजे कोरफड. कोरफड ही हवेतील फॉर्मेल्डिहाइड आणि बेंजीन हे दूषित वायू घालवते.
Image: Google
6. मनी प्लाण्ट- मनी प्लाण्ट घराघरात असतोच. पण मनीप्लाण्ट घरात का हवा हे समजून घेतलं तर घरात मनी प्लाण्ट लावणार्यांची संख्या नक्कीच वाढेल. मनी प्लांट हवेतील रासायनिक विषारी घटक घालवतो. हवा शुध्द करण्यास मनी प्लाण्टची मदत होते. मनी प्लाण्टमुळे घरातील ऑक्सिजनची पातळी वाढते.