अंगणात मोजून ४- ५ कुंड्या असल्या तरी त्यातला एखादा गुलाब (Rose plant) असतोच. कारण गुलाबाचं फुल अनेकांच्या खास आवडीचं असतं. या फुलाचा टवटवीत मोहकपणा बघूनच फ्रेश वाटतं. पण बऱ्याचदा आपण त्याच्याकडे लक्ष देण्यात कमी पडतो. म्हणून मग अख्खा सिझन निघून जातो, तरी आपल्या गुलाबाला फुलं येतच नाहीत. आली तरी त्यांची चांगली वाढ होत नाही. झाडावर किड पडते, पाने गळून जातात. आपल्या गुलाबाच्या रोपट्यासोबत असं काहीही होऊ नये आणि हंगामात गुलाब फुलांनी अगदी बहरून जावा, यासाठी ४ गोष्टी या ऑक्टोबर (Must do these 4 things in October for your rose plant) महिन्यात हमखास कराच.
ऑक्टोबर महिन्यात कशी घ्यावी गुलाबाची काळजी१. झाडांची कटींगगुलाबाच्या झाडाची कटींग करण्यासाठी ऑक्टोबर महिना अगदी उत्तम आहे. या महिन्यात गुलाबाची सॉफ्ट कटींग किंवा प्रुनिंग करा. म्हणजे फक्त वरवरची पानं आणि फांद्यांचा वरचा टोकाचा काही भाग कापा. कटिंग करताना जरा टोकदार कात्री वापरा म्हणजे कापलेले टोक अधिक डिस्टर्ब न होता, पुढची वाढ चांगली होईल.
२. माती वर खाली कराया सिझनमध्ये गुलाबाच्या झाडाची माती एकदा खाली- वर केली की ते झाडाच्या वाढीसाठी अधिक चांगले ठरते. यासाठी कुंडीच्या टोकाकडून सुरुवात करा. मधल्या भागात रोपट्याच्या जवळपास असणारी माती तशीच राहू द्या. झाडाची छोटी छोटी मुळं दिसेपर्यंत आजूबाजूची माती शक्य तेवढी काढून घ्या. जमिनीवर पसरवून ठेवा. यामुळे माती चांगली वाळेल. मातीत काही किड असेल, तर ती निघून जाईल. यानंतर पुन्हा माती कुंडीत भरून टाका.
सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात पुऱ्या टम्म फुगाव्या म्हणून ४ टिप्स, गोलगरीत पुऱ्या करा मस्त
३. झाडाला खत द्यामाती जेव्हा पुन्हा कुंडीत भराल तेव्हा अर्ध्यापेक्षा अधिक माती भरली की एखादे खत त्या मातीवर टाका. कुंडीच्या कडेकडेने खत टाका. खोडाच्या किंवा मुळांच्या अगदी जवळ खत टाकू नये. खताचा एक थर पसरवून टाकला की पुन्हा वरतून उरलेली माती टाकून द्या.
४. कुंडीत थोडी जागा ठेवाकुंडीत माती भरताना अगदी काठोकाठ भरू नका. थोडी जागा रिकामी ठेवा. यामुळे झाडाला जेव्हा तुम्ही पाणी द्याल तेव्हा ते वाहून न जाता मातीत व्यवस्थित मुरेल.