Lokmat Sakhi >Gardening > कुंडीत लावलेल्या झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं... २ सोपे उपाय- टपोऱ्या फुलांनी बघा कसं बहरून जाईल झाड

कुंडीत लावलेल्या झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं... २ सोपे उपाय- टपोऱ्या फुलांनी बघा कसं बहरून जाईल झाड

Gardening Tips To Get Lots Of Flowers To Marigold Plants: कुंडीत लावलेल्या झेंडूच्या रोपाची चांगली वाढ होत नसेल किंवा त्याला भरपूर फुलं येत नसतील, तर हा एक सोपा उपाय करून पाहा.. टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल इवलंसं झाड.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2023 02:52 PM2023-11-29T14:52:38+5:302023-12-04T10:48:51+5:30

Gardening Tips To Get Lots Of Flowers To Marigold Plants: कुंडीत लावलेल्या झेंडूच्या रोपाची चांगली वाढ होत नसेल किंवा त्याला भरपूर फुलं येत नसतील, तर हा एक सोपा उपाय करून पाहा.. टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल इवलंसं झाड.

Gardening tips to get lots of Flowering to Your marigold Plants, Remedies to get big size flowers to marigold or zendu plant, 1 secret to have more blooms in the garden | कुंडीत लावलेल्या झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं... २ सोपे उपाय- टपोऱ्या फुलांनी बघा कसं बहरून जाईल झाड

कुंडीत लावलेल्या झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं... २ सोपे उपाय- टपोऱ्या फुलांनी बघा कसं बहरून जाईल झाड

Highlightsआठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करावा. महिना भरातच मोठ्या आकाराची भरपूर  फुलं येतील. 

झेंडूच्या फुलांचं झाड अनेकांच्या घरी दिसून येतं. कारण ही फुलं देवपुजेत उपयोगी येतात. शिवाय कधी सणावाराच्याप्रसंगी सजावटीसाठी, रांगोळीसाठीदेखील या फुलांचा छानसा वापर करता येतो. शिवाय झेंडूची छान टपोरी फुलं पाहिली की मन फ्रेश होऊन जातं. (Remedies to get big size flowers to marigold or zendu plant) आता तुमच्या बागेतल्या कुंडीत लावलेल्या झेंडूच्या रोपट्याला भरपूर फुलं येत नसतील किंवा फुलांचा आकारही अगदीच लहान असेल तर काय उपाय करावेत, याची माहिती आता आपण पाहूया (1 secret to have more blooms in the garden).

 

झेंडूच्या झाडाला भरपूर फुलं येण्यासाठी उपाय

झेंडूच्या झाडाला छान टपोऱ्या आकाराची भरपूर फुलं यावीत, यासाठी नेमके काय उपाय करायचे, याविषयीची माहिती rooftop_organics या इस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

थंडीत घरात घालण्यासाठी आकर्षक चपला घ्यायच्या? बघा ३ ट्रेण्डी पर्याय- घरातही राहा एकदम स्टाईलमध्ये... 

यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार झेंडूचं रोप अगदी लहान आकाराच्या कुंडीत ठेवू नये. साधारण १८ ते २० इंची अशी मध्यम आकाराची कुंडी झेंडूचं रोप लावण्यासाठी निवडावी.

 

झेंडूच्या झाडाला फुलं आली की लगेचंच एक दोन दिवसांत त्या फांदीची फुलाच्या खालची १ ते दिड इंचाची जागा घेऊन छाटणी करावी. असं काही दिवस करताच ते झाड महिना भरातच छान बहरून जाईल आणि लवकरच त्याला भरपूर कळ्या दिसू लागतील. फुलांची छाटणी केली नाही, तर झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही.

हिवाळ्यात त्वचेला द्या केशर- बदामाचं पोषण! त्वचा होईल मऊ- चमकदार, करून पाहा १ सोपा उपाय

झेंडूच्या फुलांचा आकार मोठा- टपोरा व्हावा, यासाठी जेव्हा झाडाला फुलं आलेली नसतील तेव्हा त्या झाडावर बाजारात मिळणारे पोटॅश हे खत पाण्यात मिसळून फवारावे.

प्रियांका चोप्राची आई म्हणाली- "प्रियांकाला घडविताना माझ्याकडून खूप मोठ्या चुका झाल्या....", नेमकं काय चुकलं?

केळीमध्येही भरपूर पोटॅशियम असते. बाजारातून हे खत आणणं झालं नाही तर केळीची सालं रात्रभर पाण्यात भिजवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी झाडांना द्या. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करावा. महिना भरातच मोठ्या आकाराची भरपूर  फुलं येतील. 

 

Web Title: Gardening tips to get lots of Flowering to Your marigold Plants, Remedies to get big size flowers to marigold or zendu plant, 1 secret to have more blooms in the garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.