ताजी- टवटवीत फुलं पाहिली की मन फ्रेश- प्रसन्न होऊन जातं. म्हणून आपण आपल्या बागेत आवर्जून काही फुलझाडं लावतो. बाग छोटीशी असली किंवा अगदी बाल्कनीतल्या कुंड्या असतील तरी त्यात जास्वंद, गुलाब, मोगरा, मधुकामिनी, ऑफिसटाईम, चिनी गुलाब अशी फुलांची झाडं असतातच. पण या झाडांना जर महिनोंमहिने फुलंच येत नसतील, तर मग मात्र आपण नाराज होऊन जातो. अशावेळी झाडांसाठी विकत मिळणारे कोणतेही केमिकल्स असणारे खत आणण्यापेक्षा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (1 Secret to have more blooms in the garden). हा उपाय केल्याने अगदी १५ दिवसांतच बघा तुमची बाग रंगबेरंगी फुलांनी कशी बहरून जाते ते (home remedies to get maximum flowers to flowering plants)....
झाडांना भरपूर फुलं यावीत यासाठी उपाय
झाडांना भरपूर फुलं यावी यासाठी घरच्याघरी खत कसं तयार करायचं, याविषयीचा उपाय gardening.tipss या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला केळीचे साल, बटाटा, व्हिनेगर आणि यीस्ट हे ४ पदार्थ लागणार आहेत.
गुरुनानक जयंती: 'लंगर की दाल' घरीच करायची? पाहा ही सोपी रेसिपी, खमंग चवीसाठी खास टिप्स
यासाठी सगळ्यात आधी बटाट्याची साली काढून घ्या आणि त्याच्या भाजीसाठी करतो तशा बारीक फोडी करा.
यानंतर चिरलेला बटाटा एका ग्लासमध्ये टाका. त्यात केळीचं साल, १ टेबलस्पून व्हिनेगर आणि १ टीस्पून यीस्ट टाका.
या ग्लासमध्ये ५०० मिली पाणी टाका आणि ७ ते ८ तास ठेवून हे मिश्रण फर्मेंट होऊ द्या.
त्यानंतर कुंडीतली माती थोडीशी उकरून त्यात हे मिश्रण टाका. मध्यम आकाराची कुंडी असेल तर एका झाडाला १ ते २ पळी एवढं हे मिश्रण टाकावं.
हिवाळ्यात मॉईश्चरायझर, बॉडीलोशन, लिपबामवर खर्च करण्यापेक्षा ६ नैसर्गिक उपाय करा- त्वचा राहील मुलायम
आठवड्यातून एकदा हा उपाय करा. अगदी १५ दिवसांतच खूप चांगला परिणाम दिसून येईल, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.