Join us  

झाडाची पानं सुकली- सारखी गळतात? २ पदार्थ वापरून घरीच तयार करा औषध- झाडं होतील हिरवीगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2023 2:52 PM

Gardening Tips To Treat Leaf Loss: झाडाची पानं सुकत चालली असतील आणि पिवळी पडून गळून जात असतील तर हा एक घरगुती उपाय करून पाहा.

ठळक मुद्देझाडांवर इतर कोणतंही केमिकल फवारण्याच्याआधी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा

झाडं कायमच छान बहरलेली दिसावी, यासाठी त्यांची पुरेशी काळजी घेणं गरजेचं असतं. झाडांची काळजी घेण्यात काही कमी- जास्त झालं किंवा झाडांना पुरेसं पोषण नाही मिळालं तर झाडांची पानं सुकत जातात, पिवळी पडतात आणि पानं गळण्याचं प्रमाण वाढू लागतं (How to stop leaf loss?). असं झालं तर झाडांवर इतर कोणतंही केमिकल फवारण्याच्याआधी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (Home remedies to reduce leaf loss). पानं गळण्याचं प्रमाण कमी होईल तसेच झाडं छान हिरवीगार होतील.(how to treat leaf loss and yellowing of leaves)

 

झाडांची पानं सुकली असतील तर उपाय

झाडांची पानं सुकली असतील, पिवळी पडून खूप गळू लागली असतील तर नेमका काय उपाय करावा, याविषयीची माहिती gardening.999 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

एक्स बॉयफ्रेंड रजत ताराबाबत सुश्मिता सेन सांगतेय- "ब्रेकअप झालं तरी आजही तो माझा सगळ्यात मोठा सपोर्टर, कारण...."

हा उपाय करण्यासाठी आपल्याला २०० मिली पाणी, २ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर, २ टेबलस्पून साखर लागणार आहे.

सगळ्यात आधी एका भांड्यात २०० मिली पाणी घ्या आणि त्यात व्हाईट व्हिनेगर टाका. व्हिनेगर हे मातीसाठी स्टरलायझर आणि डिसइंन्फेक्टंट म्हणून काम करते. 

हिवाळ्यासाठी स्वेटशर्ट घ्यायचे? बघा ३ सुपर स्टायलिश- ट्रेण्डी पर्याय, खिशाला परवडणाऱ्या किमतीत...

त्यानंतर त्यात साखर टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. झाडं टवटवीत होण्यासाठी साखरेमधील घटक उपयुक्त ठरतात.

हे मिश्रण एकत्र करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा..

 

कसा करायचा वापर?

वरील मिश्रण मातीमध्येही टाकता येते, तसेच झाडांच्या पानांवरही फवारता येते. 

यासाठी कुंडीतल्या मातीचा वरचा थर थोडा अलगद उकरून घ्या. असं करताना रोपट्यांच्या मुळांना धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या.

केसांतून नुसता हात फिरवला तरी केस गळून येतात? 'ही' पावडर खाऊन बघा- १५ दिवसांत केस गळणं कमी 

यानंतर त्या उकरलेल्या मातीमध्ये आपण तयार केलेले मिश्रण शिंपडा. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास तसेच मातीमध्ये झाडांच्या वाढीसाठी मारक ठरणारे काही घटक असतील, तर ते नाहीसे होण्यास मदत होते.

झाडांच्या पानांवरही हे मिश्रण फवारावे. यामुळे पाने छान हिरवीगार- टवटवीत दिसतात. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सखतेगच्चीतली बाग