Lokmat Sakhi >Gardening > बागेला तारांचं कशाला, झाडाचंच कुंपण करा... बघा ४ उत्तम 'बाउंड्री' प्लान्ट्स, देखणी दिसेल बाग 

बागेला तारांचं कशाला, झाडाचंच कुंपण करा... बघा ४ उत्तम 'बाउंड्री' प्लान्ट्स, देखणी दिसेल बाग 

Gardening Tips: जमिनीवरच्या छोट्याशा बागेला झाडांचंच फेन्सिंग किंवा कुंपण करायचं असेल तर ते कसं करावं, त्यासाठी नेमकी कोणती झाडं लावावीत, त्याविषयी थोडंसं.....(border or boundry plants for Garden)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 04:31 PM2023-09-13T16:31:14+5:302023-09-13T16:31:59+5:30

Gardening Tips: जमिनीवरच्या छोट्याशा बागेला झाडांचंच फेन्सिंग किंवा कुंपण करायचं असेल तर ते कसं करावं, त्यासाठी नेमकी कोणती झाडं लावावीत, त्याविषयी थोडंसं.....(border or boundry plants for Garden)

Gardening Tips: Top 4 Edging Plants or border or boundry plants for Garden | बागेला तारांचं कशाला, झाडाचंच कुंपण करा... बघा ४ उत्तम 'बाउंड्री' प्लान्ट्स, देखणी दिसेल बाग 

बागेला तारांचं कशाला, झाडाचंच कुंपण करा... बघा ४ उत्तम 'बाउंड्री' प्लान्ट्स, देखणी दिसेल बाग 

Highlights जमिनीवरच्या किंवा अंगणातल्या बागेचं सौंदर्य खुलविण्यासाठी हल्ली अनेक जण बागेला झाडांचंच छानसं कम्पाउंड करतात.

आपल्या अंगणात जशी जागा मिळेल तशी कुठेही आणि कशीही झाडं लावण्यापेक्षा ती थोडी विचार करून, योग्य जागा ठरवून आणि व्यवस्थित मांडणी करून लावली तर नक्कीच आपली बाग आणखी छान दिसते. मग ती बाग अंगणातली असो किंवा आपल्या छोट्याशा बाल्कनीमधली. जमिनीवरच्या किंवा अंगणातल्या बागेचं सौंदर्य खुलविण्यासाठी हल्ली अनेक जण बागेला झाडांचंच छानसं कम्पाउंड करतात. त्यासाठी खास बॉर्डर प्लान्ट्स किंवा बाऊंड्री प्लान्ट्स लावले जातात. तुम्हालाही तुमच्या बागेसाठी असंच छानसं हिरवंगार किंवा फुलाफुलांचं कम्पाउंड किंवा कुंपण करायचं असेल, तर कोणती झाडं लावता येतात, ते पाहूया.... (Top 4 Edging Plants or border or boundry plants for Garden)

 

बागेला कुंपण करण्यासाठी वापरण्यात येणारी झाडे किंवा रोपटी.....
१. बाडाची रोपटी 

ही रोपटी आपल्याला बऱ्याच ठिकाणी अगदी सहज दिसून येतात. जर तुमच्या बागेची जागा मोठी असेल तर बाडाची रोपट्यांची बॉर्डर लावू शकता. या झाडांना खूप ऊन लागतं, शिवाय कमी पाण्यातही ती चांगली तग धरून राहतात.

 

२. स्नेक प्लान्ट
जर बागेची जागा छोटी असेल तर स्नेक प्लान्टची बॉर्डर शोभून दिसेल.

जोडीदार आपल्याला गृहित धरतोय हे कसे ओळखाल? धोक्याची घंटा वाजवणारी ३ लक्षणे, सावध व्हा..

कारण या झाडांना खूप जागा लागत नाही. शिवाय ती उंचीनेही खूप वाढत नाहीत. या रोपट्यांनाही खूप मेंटेनन्सची गरज नसते.

 

३. पाम ट्री
जर बाग बऱ्यापैकी मोठी असेल तर पाम ट्री ची बॉर्डर छान दिसेल.

भाजी आवडीची नाही, मग तोंडी लावायला ५ मिनिटांत करा एक झणझणीत पदार्थ - जेवणाची वाढेल रंगत

शिवाय बागेत तुम्हाला आडोसा हवा असेल, तरीही पाम ट्री हा एक चांगला पर्याय आहे. ही झाडंही नेहमीच हिरवीगार असतात.

 

४. बांबूचे झाड
बांबूची झाडं खूप उंचच उंच होतात. अनेक जण त्यांच्या बागेतच नाही तर घराभोवती पुर्णपणे बांबूचे हिरवेगार कुंपण करतात. 

 

Web Title: Gardening Tips: Top 4 Edging Plants or border or boundry plants for Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.