Join us  

कुंडीत आलं कसं लावायचं पाहा, मातीत मिसळा फक्त १ गोष्ट- आलं येईल भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2024 5:59 PM

Ginger Growing Tips, Techniques, Ideas, and Secrets : चहाला घरचं ताजं आलं हवं तर ‘असं’ लावा कुंडीत आलं..

रिमझिम बरसणारा पाऊस असो किंवा मग कडाक्याची थंडी (Gardening Tips). या ऋतू दरम्यान आल्याचा चहा मिळाला तर बेस्ट आहे. गरमागरम वाफाळता चहा प्यायला मिळणं म्हणजे निव्वळ स्वर्गसुख (Ginger Tips). आल्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये होतो. आल्याच्या फक्त एका छोट्याश्या तुकड्यामुळेही पदार्थाची रंगत वाढते.

पण बाजारातून घरी आलं आणल्यानंतर खराब होतं. किंवा वारंवार आलं आणायला बाजारात जाणार कोण? असाही प्रश्न निर्माण होतो. जर घरात छोटीशी कुंडी पडली असेल तर, आपण त्यात आल्याचे कंद लावू शकतो. पण अनेकांना आल्याचे कंद लावायचं कसं हे बऱ्याच जणांना ठाऊक नसते. आल्याचे कंद लावताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्यात? पाहूयात(Ginger Growing Tips, Techniques, Ideas, and Secrets).

कुंडीत आल्याचा कंद कसं पेरायचं?

- कुंडीत आलं लावण्यासाठी कोणत्याही बियाणाची गरज नाही. फक्त आल्याचा तुकडा पुरेसा आहे. पण आल्याच्या तुकड्यावर ग्रोथ बड्स यायला हवे. जेणेकरून आल्याची योग्य वाढ होईल.

व्यायाम करताना थकवा जाणवतो? खा स्टॅमिना वाढवणारे ५ पदार्थ, दिवसभर वाटेल एनर्जेटिक - वजनही घटेल

- सर्वात आधी कुंडीतली थोडीशी माती हातानेच बाजूला करून घ्या. त्यामध्ये आल्याचा साधारण दिड ते २ इंच तुकडा घाला. त्यावर पुन्हा माती घाला.

- कुंडीतल्या मातीमध्ये कोको पीट, वर्मी कंपोस्ट आणि शेणाचे खत मिसळा. यामुळे आल्याची योग्य वाढ होईल.

- माती जास्त ओली किंवा चिकट नसावी. जास्त पाणीही घालण्याची गरज नाही. माती सुकल्यानंतरच त्यात पाणी घाला. जेणेकरून कंद कुजणार नाही.

- कुंडी नेहमी सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून ते रोपाच्या वाढीस मदत करेल.

पावसाळ्यात ४ पदार्थ न चुकता खा, सुधारेल पचन आणि मेटाबॉलिजम वाढल्याने वजनही घटेल पटकन

-  साधारण २१ ते २५ दिवसांनी कुंडीत पाने उगवलेली दिसतील. हे रोपटे जेव्हा ३ ते ४ महिन्यांचे होईल आणि त्याची पाने पिवळट पडून सुकलेली दिसू लागतील. तेव्हा मुळातून कंद बाहेर काढा.

- गरजेनुसार एक एक फांदी जमिनीतून काढावी आणि त्याला लागलेला आल्याचा कंद तोडून घ्यावा.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल