फोडणीमध्ये कडीपत्ता हवाच. पोहे ते ढोकळा कडीपत्ताशिवाय हे पदार्थ अपूर्ण आहे (Curry Leaves). भारतीय घरांमध्ये कडीपत्ता असतोच. पण बऱ्याचदा घरातला कडीपत्ता संपतो (Gardening). किंवा बाजारातून आणलेला कडीपत्ता फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर लगेच वाळतो. त्यामुळे सुकलेल्या कडीपत्त्याचा वापर करावा लागतो. किंवा काही जण सुकलेला कडीपत्ता फेकून देतात.
प्रत्येकवेळी आपल्याला फ्रेश कडीपत्ता मिळेलच असे नाही. जर आपल्याला वारंवार बाजारात जाऊन कडीपत्ता आणावा लागत असेल तर, लहानशा कुंडीत कडीपत्ता लावा. अनेक जण कडीपत्त्याचे झाड वाळते अशी तक्रार करतात. पण मग कडीपत्त्याचे झाडाची कशी काळजी घ्यावी? कडीपत्त्याचे झाड हिरव्यागार पानांनी कसे बहरेल? पाहूयात(Growing Curry Leaves - Caring For Curry Leaf Plants).
कुंडीतल्या कडीपत्त्याची कशी काळजी घ्याल?
हंगामानुसार खते घाला
अनेकदा माहितीअभावी आपण प्रत्येक ऋतूत झाडाला एकच प्रकारचे खत आणि पाणी देतो. यामुळे कुंडीतले रोप सुकते. कडीपत्त्याचे रोप देखील या कारणामुळे सुकते. छान डेरेदार होऊन बहरत नाही. अशावेळी कुंडीतल्या मातीत विविध प्रकारचे खत मिसळा. हिवाळ्यात कडीपत्त्याच्या झाडाला खत घालू नये.
छाटणी करत राहा
प्रत्येक झाडाची छाटणी महत्वाची. कडीपत्त्याचे रोप अचानक सुकले असेल तर, घाबरू नका. पिवळ्या पानांची छाटणी करीत राहा. शिवाय कडीपत्त्याच्या रोपाला फुलं येत असतील तर, ती देखील कापून टाका. फुलांमुळेही रोपाची योग्य वाढ होत नाही.
पोट, मांड्या-दंड थुलथुलीत दिसतात? 'इवल्याशा' बिया कमी करू शकतात तुमचं वजन..पण कसे?
घरातच तयार करा खत
बाजारात मिळणाऱ्या खतामुळे जर रोप सुकत असेल तर, घरातच खत तयार करा. यासाठी आपल्याला तांदुळाची आवश्यकता आहे. वाटीभर तांदूळ घ्या. मिक्सरमध्ये घालून भरड तयार करा. तांदुळाची पावडर करू नका. आता एका बाऊलमध्ये पाणी घ्या. त्यात तांदुळाची पावडर घाला. एका तासानंतर पाणी गाळून एका बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवा. आठवड्यातून एकदा आपण या पाण्याचा वापर कुंडीतल्या मातीत करू शकता. यामुळे कडीपत्त्याचे झाड हिरव्यागार पानांनी बहरेल.