घरात, बाल्कनीत फुल झाडं लावल्याने घराचे सौंदर्य अधिकच खुलते. जास्वंद, गुलाबाच्या रोपाबरोरबच मोगऱ्याचं रोपंही लावलं जातं. मोगऱ्याच्या रोपाला भरपूर फुलं लागले की घरातलं वातारवरणंच बदलून जातं. पावसाळ्याच्या दिवसांत मोगरा भरपूर प्रमाणात फुलतो. मोगऱ्याच्या रोपाची व्यवस्थित वाढ व्हावी यासाठी काही बेसिक टिप्स फॉलो कराव्या लागतील. (Hacks To Get More Flowers In Mogra Plant)
अनेकांना अशी समस्या उद्भवते की मोगऱ्याच्या रोपाला व्यवस्थित फुलं येत नाहीत. अनेकदा लोकांच्या घरातील मोगऱ्याची फुलं सुकतात मोगऱ्यांच्या रोपाला फुलं येत नसतील तर तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. (Gardening Tips)
मोगरा अशावेळी फुलतो तेव्हा त्याला व्यवस्थित ऊन मिळते. मोगरा फक्त १ ते २ तास उन्हात ठेवून चालत नाही तर ५ ते ६ तासांच्या उन्हात ठेवल्यानंतर तुम्हाला फरक दिसून येईल.
२७ किलो कमी करण्यासाठी आमिर खानने घेतलं होत खास डाएट; वेट लॉस जर्नीचं सोपं सिक्रेट
प्लास्टीकच्या कुंडीत मोगरा लावू नका
मोगऱ्याच्या फुलाला फुलण्यासाठी उन्हाची आवश्यता असते. पण प्लास्टीकच्या कुंडीत रोप ठेवू नये. जेव्हा कोणत्याही रोपाला ५ ते ६ तास ऊन मिळते तेव्हा प्लास्टीकमधून हिट जनरेट होते. गरजेपेक्षा जास्त हिट मिळाल्यानेर रोप सुकू लागते. म्हणूनच मातीच्या भांड्यात किंवा सिमेंटच्या भांड्यात हे रोप लावा.
मोगऱ्याच्या रोपासाठी भरपूर न्युट्रिएंट्स आवश्यक
मोगरा एक हेवी फिडर आहे मोगऱ्याच्या रोपाला अनेक न्युट्रिएंट्सची आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही हे लावाल तेव्हा ५० टक्के गोबर खत किंवा वर्मी कम्पोस्टची आवश्यकता असेल. याशिवाय जेव्हा माती तयार कराल तेव्हा ५० टक्के शेणं, १५ टक्के रेती, १० टक्के कोकोपीट आणि बाकी गार्डन सॉईलचा वापर करा.
जास्वंदाचं रोपं लावलंय पण त्यात फुलंच नाही? मातीत 'ही' १ सिक्रेट वस्तू मिसळा, फुलचं फुलं येतील
चांगली फुलं येण्यासाठी तुम्ही यात एप्सम सॉल्टचा वापर करू शकता. २ लिटर पाण्यात १ चमचा मीठ घालून ठेवा. त्यानंतर कोणत्याही स्प्रे बॉटलने स्प्रे करा. १५ दिवसांच्या आत तुम्हाला नवीन फुलं आलेली दिसून येतील. ही खूपच महत्वाची गार्डनिंग टिप आहे. मोगऱ्याला कळ्या आल्यानंतर फुलं पडतात आणि त्याचे पॉड्स तसेच राहतात.
मोगऱ्याच्या रोपाची छाटणी करणं खूपच महत्वाचे आहे. फुलं चांगली फुलण्यासाठी कटींग ही प्रक्रिया फार महत्वाची आहे. मोगऱ्याच्या रोपाला चांगले ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं महत्वााचे आहे. यासाठी माती सुकू देऊ नका. रोपं सुकणार नाही याची काळजी घ्या.