आपल्या घरच्या गार्डनमध्ये किंवा कुंडीत एखाद तरी जास्वंदीच्या फुलांचं रोपटं असतंच. लाल,पिवळ्या, पांढऱ्या अशा विविध रंगात येणारी जास्वंदीची फुल आपल्या गार्डनची शोभा वाढवतात. या फुलाच्या प्रत्येक प्रजातीमध्ये वेगवेगळ्या रंगांची व आकाराची फुले पाहायला मिळतात. जास्वंदीच्या फुलाला (Tips for Keeping Hibiscus Blooming All Season Long) मनमोहक सुगंध जरी नसला तरीही ही फुल अतिशय सुंदर दिसतात. हे जास्वंदीचे फुल जितके सुंदर असते तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. जास्वंदाच्या फुलाचे तेल आपल्या केसांसाठी फायदेमंद असते. याचबरोबर जास्वंदीच्या झाडांची पाने देखील उष्णतेने आलेल्या फोडांवर उपयोगी ठरतात. असे हे बहुउपयोगी जास्वंदीचे एक तरी रोपटे घरात असावे म्हणून प्रत्येकजण ते आवडीने बागेत लावतोच(How can I encourage my hibiscus to bloom?).
जास्वंदीचे झाड जर लालचुटुक फुलांनी बहरून गेलेले असेल तरच ते सुंदर दिसते. असे असले तरीही काहीवेळा बदलत्या हवामानानुसार किंवा (How To Grow And Care For Summer-Blooming Hibiscuses) इतर काही गोष्टींमुळे झाडांवर फुल उमलून येत नाहीत. काहीवेळा फुल उमलून लगेच कोमेजून गळून पडतात. याचबरोबर कधी कधी या झाडाला असंख्य फुले (4 SECRETS TO INCREASE FLOWERING IN HIBISCUS) येतात तर काहीवेळा एकही फुल फुलून येत नाही. अशावेळी हे झाड मलूल पडते असे होऊ नये म्हणून आपण त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. जास्वंदीचे झाड कोमेजून गेले असेल (Try This Hack To Get More Hibiscus Flowers On Your Plant) तर ते पुन्हा बहारदार करण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स लक्षात ठेवूयात(HOW TO GET FLOWERS IN HIBISCUS PLANT).
मलूल होऊन पडलेल्या जास्वंदीच्या झाडाची काळजी कशी घ्यावी ?
१. जास्वंदीच्या रोपाची लागवड करताना कोणत्या प्रकारची माती आपण वापरतो याकडे लक्ष देणे गरजेचे असते. योग्य माती वापरण्याबरोबरच दर ४ ते ६ महिन्यांनी ही माती बदलण्याची काळजी घेतली पाहिजे. जर काही कालांतराने आपण ही माती बदलत नसाल तर कुंडीतील माती थोडी खाली - वर करून मोकळी करुन घ्यावी. एवढेच नव्हे तर ही माती मोकळी करताना त्यात योग्य त्या प्रमाणात खत देखील घालावे. योग्य वेळी योग्य मातीचे व खताचे प्रमाण एकत्रित करून ही माती ताजी व मोकळी करून घ्यावी.
२. जास्वंदीच्या झाडावर सतत किटकांचा प्रादुर्भाव होत असल्यास कडुलिंबाच्या स्प्रेची फवारणी रोपांवर करावी. यासाठी आपल्याला १ बाऊल पाणी घेऊन त्यात १ चिमूटभर बेकिंग सोडा, १ टेबलस्पून शॅम्पू आणि २ ते ३ थेंब कडुलिंबाचे तेल मिसळून स्प्रे तयार करावा. आता ही फवारणी आठवड्यातून एकदा झाडावर करावी. यामुळे झाडांवर येणाऱ्या मुंग्या, मावा, किटक हे कायमचे नाहीसे होतात.
३. जास्वंदीच्या झाडाची काही पाने किंवा फांद्या खराब झाल्या असतील तर त्या वेळीच छाटून टाकाव्यात. याकडे दुर्लक्ष करु नये. खराब फांद्या किंवा पाने वेळीच छाटल्याने जास्वंदीचे झाड चांगले बहरु लागते.
४. जास्वंदीच्या झाडाला रोज योग्य प्रमाणांत पाणी घाला व काहीकाळ ते उन्हांत ठेवा. यासोबतच आठवड्यातून एकदा इनो पावडर पाण्यांत मिसळून हे पाणी झाडाच्या मातीत ओतावे. यामुळे झाडांवर कोणतीही किड न लागता झाड छान हिरवगार होऊन झाडाला भरपूर फुल येतील.
शहाळे पिऊन झाल्यानंतर फेकून देता? अजिबात फेकू नका, पाहा भन्नाट आयडिया, करा घरात डेकोरेशन