Join us  

होम गार्डनमध्ये असायलाच हवीत ५ रोपं; बाग फुलवताना आरोग्य-सौंदर्याचाही विचार व्हायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 5:24 PM

Home Gardening Tips : होम गार्डन सजवताना आपल्याला उपयुक्त अशा रोपांची त्यामध्ये आवर्जून निवड करायला हवी.

ठळक मुद्देघरातील रोपांची निवड करताना आरोग्यासाठी उपयुक्त अशी रोपंही लावायला हवीतहोम गार्डनिंगमध्ये कोणत्या रोपांची निवड करावी याविषयी...

घरातल्या गॅलरीत किंवा अगदी खिडकीच्या ग्रीलमध्ये आपली अशा छोटीशी बाग असावी असं प्रत्येकाला वाटतं. ही छोटीशी बाग फुलवताना त्यामध्ये कोणकोणती रोपं असावीत याचा आपण बारकाईने विचार करतोच असं नाही. बरेचदा देवाला फुलं हवीत म्हणून किंवा दिसायला छान असणारी रोपं आपण खरेदी करतो आणि आपली छोटीशई गार्डन फुलवतो. हे बरोबर असले तरी आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी उपयुक्त अशी काही रोपं आपल्या होम गार्डनमध्ये आवर्जून लावायला हवीत. आता आपल्यासाठी फायदेशीर असणारी अशी कोणती रोपं लावता येतील याबाबत समजून घ्यायला हवे (Home Gardening Tips). 

१. कोथिंबीर 

कोथिंबीर ही केवळ पदार्थाला सजवण्यासाठी उपयुक्त नसते तर त्वचेचा दाह कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी, डायरीया, माऊथ अल्सर यांसारख्या समस्यांवर कोथिंबीर अतिशय उपयुक्त असते. घरातल्या कुंडीत धणे घातल्यास कोथिंबीर सहज उगवू शकते. 

(Image : Google)

२. ओवा 

ओवा पचनसंस्थेशी आणि पोटाशी निगडीत तक्रारींसाठी अतिशय उपयुक्त असल्याने आपल्या गार्डनमध्ये हे रोप आवर्जून असायला हवे.

३. पुदिना 

अनेकदा मळमळ, स्नायूंचे दुखणे, पोटाचे दुखणे यांसारख्या तक्रारींवर पुदीना अतिशय चांगले काम करतो. पदार्थाला फ्लेवर येण्यासाठीही आपण स्वयंपाकात पुदीना वापरतो. पुदीना बॉडी डीटॉक्स करण्यासाठीही उपयुक्त असल्याने होम गार्डनमध्ये पुदीना अवश्य लावायला हवा.

४. कोरफड 

कोरफड केसांच्या आणि त्वचेच्या बऱ्याच समस्यांवर अतिशय फायदेशीर असते. वेगवेगळ्या प्रकारचे पॅक तयार करण्यासाठी कोरफडीचा अतिशय चांगला उपयोग होतो. कोरफडीत असणारे अँटी इन्फ्लमेटरी घटक त्वचेच्या समस्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात.   

(Image : Google)

५. तुळस 

तुळशीमध्ये विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि खनिजे, लोह असल्याने आरोग्यासाठी तुळस खाणे फायदेशीर असते. थंडीच्या दिवसांत किंवा पावसाळ्यात विविध संसर्गांचा सामना करण्यासाठी तुळशीची पाने आवर्जून खायला हवीत. 

 

 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स