दिवाळी झाली आणि वातावरणात थोडा गारवा जाणवायला सुरुवात झाली आहे. थंडीचा कडाका जसा जसा वाढत जातो, तसा तसा त्याचा परिणाम काही रोपांवर होतो. त्यामुळे मग जास्वंद, गुलाब अशा रोपांना फुलं येण्याचं प्रमाण बरंच कमी होऊन जातं. बऱ्याचदा तर असं होतं की रोप नुसतंच वाढतं. पण अगदी ८- ८ दिवस रोपांवर एकही फुल किंवा कळी दिसत नाही. रोपांना फुलं, कळ्या येण्याची अक्षरश: वाट पाहावी लागते (home made fertilizer for flowering plants). अशी फुलांविना बाग पाहिली की आपलाही हिरमोड होतो. म्हणूनच हा एक सोपा उपाय पाहून घ्या. हा उपाय केला तर तुमच्या बागेत कधीही फुलांना खंड पडणार नाही.(how to get maximum flowers from plants?)
रोपांना भरपूर फुलं येण्यासाठी उपाय
रोपांना भरपूर फुलं येण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ yuvakisanmp_10 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला २ लीटर पाणी, २०० ग्रॅम गूळ आणि १ डझन केळीची सालं लागणार आहेत.
इडली फुगत नाही- चिकट होते? ५ गोष्टी करून पाहा- मस्त फुगून कापसासारखी मऊ होईल
सगळ्यात आधी तर एखाद्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये २ लीटर पाणी टाका. त्यामध्ये गूळ टाकून तो पुर्णपणे पाण्यात विरघळून घ्या.
गूळ पाण्यात पुर्णपणे विरघळल्यानंतर त्यामध्ये केळीची सालं बारीक चिरून टाका. बाटलीचं झाकण लावून सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून घ्या.
ही बाटली आता ८ ते १० दिवसांसाठी जिथे खूप ऊन येणार नाही अशा ठिकाणी थोड्या सावलीतच ठेवा. दिवसातून एकदा न विसरता बाटली एखाद्या मिनिटासाठी हलवा.
तुमचंही जेवण ५- १० मिनिटांत होतं का? भराभर जेवण्याची सवय असणाऱ्यांना ३ आजारांचा धोका
१० दिवसांनंतर बाटली उघडा आणि तिच्यातलं पाणी गाळून घ्या. केळीची सालं टाकून द्या आणि पाणी पुन्हा बाटलीमध्ये भरून ठेवा. हे पाणी झाडांसाठी अतिशय उत्तम खत आहे.
आता अशा पद्धतीने तयार केलेलं १ लीटर पाणी १ बादलीभर पाण्यात टाका आणि १५ दिवसांतून एकदा ते रोपांना द्या. यामुळे रोपांना भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि फॉस्फरस मिळून भरपूर फुलं येतात.