आपल्याला माहितीच आहे की गार्डनिंग करणं म्हणजे नुसतंच झाडं लावणं असं नाही. झाडांची वेळोवेळी काळजी घ्यावी लागते, त्यांना खत- पाणी देऊन ऊन- सावली व्यवस्थित मिळतेय की नाही, याकडे लक्ष द्यावं लागतं. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी जशी व्हिटॅमिन्सची, प्रोटीन्सची आणि इतर जीवनसत्त्वांची गरज असते, तसंच झाडांचंही असतं. झाडांना कायम सदाबहार ठेवायचं असेल तर त्यांना वेळोवेळी पोषण मिळालं पाहिजे (Home remedies for getting more flower). पण आता वेळेअभावी तुम्हाला झाडांना नियमित खत द्यायला वेळ नसेल तर फक्त एवढं एकच काम करा (home hacks for natural fertilizers to plants). झाडांना आपोआप पोषण मिळेल आणि झाडं कायम हिरवीगार राहतील. (how to keep plants always healthy and green)
झाडांना खत देण्याचा सोपा उपाय
झाडांना नेहमीच पुरेसं पोषण मिळावं यासाठी नेमका काय उपाय करायचा, याविषयीची माहिती getmyharvest या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाण्याची एक रिकामी बाटली लागणार आहे.
कांदे- बटाटे एकाच टोपल्यात साठवून ठेवणं योग्य आहे का? बघा नेमकं काय चूक आणि काय बरोबर
पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटलीचा वरचा भाग कापून घ्या. आता त्या बाटलीच्या खालच्या भागात बारीक बारीक छिद्र करून घ्या.
अशी छिद्रे पाडलेली बाटली कुंडीतल्या मातीत खाेचून टाका. बाटलीचे फक्त वरचे तोंड मातीला समांतर असेल आणि बाकी सगळा भाग मातीत असेल, अशा पद्धतीने बाटली मातीत खोचावी.
त्यानंतर या बाटलीमध्ये आता पाणी टाकून ठेवा. या पाण्यामध्ये केळीच्या साली, कांद्याची टरफलं, संत्र्यांच्या साली असं सगळं टाकून ठेवत जा.
असं केल्याने केळीच्या किंवा संत्र्याच्या सालींचे, कांद्याच्या टरफलांचे पौष्टिक पाणी आपोआप झाडांना मिळेल. यातून झाडांना पोटॅशियम, नायट्रोजन हे महत्त्वाचे घटक मिळतात. त्यामुळे मग झाडं कायम हिरवीगार राहण्यास मदत होते. तसेच भरपूर फुलंही येतात.