झाडांना जर योग्य पोषण मिळालं नाही तर झाडांची पाने सुकतात. झाडांची पान सुकण्याची किंवा पिवळी पडण्याची तशी इतरही अनेक कारणं आहेत. जर झाडांना पाणी कमी मिळालं, सूर्यप्रकाश पुरसा मिळाला नाही, तरीही झाडांची हवी तशी वाढ होत नाही. आणि झाडांची पाने पिवळी पडून सुकू लागतात (Home remedies for well growth of plants). तुमच्या झाडांना सूर्यप्रकाश, पाणी या गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळत असूनही झाडांची पानं सुकत चालली असतील (How to get rid of yellow leaves of plants?) तर हा एक घरगुती उपाय करून पहा.(What to do if plants leaves are dried)
झाडांची पान सुकून पिवळी पडत असल्यास घरगुती उपाय
झाडांची पान सुकत चालली असतील किंवा पिवळी होत असतील तर त्यासाठी काय करावं याविषयीचा उपाय gardening.999 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन कागदी कफ लागणार आहेत. यालाच आपण यूज अँड थ्रो चे कपही म्हणू शकतो.
सगळ्यात आधी एका ग्लासला खालच्या बाजूने छिद्रे पाडून घ्या आणि हा ग्लास दुसऱ्या ग्लासमध्ये ठेवा. जेणेकरून आपण या ग्लासमध्ये जे मिश्रण तयार करणार आहोत ते गाळले गेल्यानंतर खालच्या ग्लासमध्ये जमा होईल. यानंतर या ग्लासमध्ये ग्रीन टी सुटा करून टाका.
जेवढा ग्रीन टी असेल तेवढीच तंबाखू किंवा तंबाखूची पाने टाका आणि त्यात साधारण अर्धा कप उकळतं पाणी टाका. आता हे मिश्रण तसेच ठेवून द्या. हळूहळू चहाचे आणि तंबाखुचे पाणी खालच्या ग्लासमध्ये जमा होईल.
इशा गुप्ताचे बनारसी साडीतले देखणे फोटोशूट, बघा तिच्या सुंदर साड्यांवरची अनोखी नजाकत
याऐवजी ग्रीन टी आणि तंबाखू एकत्र करून ते उकळून घ्यायचं. आणि मग गाळून घेऊन पाणी वेगळं करायचं, असंही तुम्ही करू शकता.
हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि झाडांवर थोडे थोडे शिंपडा. थोडेसे पाणी मातीतही टाका. आठवड्यातून साधारण दोन वेळा हा उपाय करा. झाडांना योग्य ते पोषण मिळेल आणि झाडे छान हिरवीगार होतील.