जास्वंद हे आपल्या घरातल्या बागेत आवर्जून असणारं एक रोप. गणपतीला आवडणारी आणि केसांच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर असलेली ही फुलं रोपाला आली की अतिशय सुंदर दिसतात. लाल, गुलाबी, पिवळा अशा एकाहून एक छान रंगात असलेलं जास्वंद कुंडीत दिसायलाही छान दिसतं. म्हणूनच आपण होम गार्डनमध्ये गुलाब, शेवंती आणि मोगरा यांसारख्या फुलांसोबत एखादं तरी जास्वंदाचं रोप लावतोच. सुरुवातीला या रोपाला छान बहर येतो पण हळूहळू याची फुलं येणं बंद होतं आणि काय झालं ते आपल्यालाही कळत नाही (Home Remedy to grow hibiscus plant in winter).
काहीवेळा फांद्या खूप वाढतात पण कळ्या आणि फुलं मात्र येत नाहीत. कधी जास्वंदाला किड लागते तर कधी खूप मुंग्या. अशावेळी आपण रोपाचे कटींग करतो. त्यावर किटकनाशके फवारतो आणि रोपाची नीट वाढ व्हावी यासाठी त्याला विकतची महागडी खतंही घालतो. मात्र त्यापेक्षा घरच्या घरी एक सोपा उपाय केल्यास हे रोप मस्त वाढून, त्याला छान कळ्या येऊन फुलंही यायला लागतात. पाहूयात ही ट्रीक कोणती आणि ती कशी वापरायची...
१. एका बादलीत किंवा मोठ्या भांड्यात साधारण १ लिटर पाणी घ्या.
२. त्यामध्ये १ चमचा इप्सम मीठ घाला.
३. या मिश्रणात NPK 00:00:50 हे किटकनाशक १ चमचा मिसळा.
४. यात १ लहान पाऊच कॉफी मिसळा आणि सगळे एकजीव करा.
५. हे तयार केलेले पाणी जास्वंदाच्या रोपाला १ ते दिड ग्लास घालायचे.
६. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा प्रयोग केल्यास जास्वंदाला नक्कीच बहर येण्यास मदत होईल.