Join us  

प्राजक्ताच्या फुलांचा अंगणात पडेल सडा, वापरा फक्त ३ नैसर्गिक खतं ! प्राजक्ताचं झाड घराजवळ असणे आनंददायी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2023 4:37 PM

Homemade fertilizer for parijat : प्राजक्ताच्या फुलांचा भरगच्च सडा आपल्याही अंगणात पडेल, मिळेल भरपूर सुख...

"टप..टप..पडती अंगावरती प्राजक्ताची फुले..." हे प्राजक्ताच्या फुलांचे सुंदर वर्णन करणारे गाणे तर आपण लहानपणी ऐकलेच असेल. पूर्वीच्या काळी किंवा गावी प्रत्येकाच्या अंगणात प्राजक्ताचे झाड असायचेच. सकाळ झाल्यावर या पांढऱ्याशुभ्र फुलांचा भरगच्च सडा अंगणात पडत असे. घरांतील स्त्रिया अंगणात पडलेल्या फुलांचा सडा न चुकता वेचत असतं. ही वेचलेली फुल सामान्यतः आपण देवाला वाहतो किंवा त्याचा छान हार बनवतो. प्राजक्ताच्या फुलांचा येणारा मंद सुगंध सगळ्यांनाच फार प्रिय असतो. या फुलांच्या सुगंधाने मन शांत होते आणि मानसिक तणावही दूर होतो( Parijat Plant Grow and Care Tips Fertilizer To Get Flowers).

प्राजक्ताचे फुल हे अनेक मोहक फुलांपैकी एक आहे. त्याची फुले फुलल्यानंतर जमिनीवर पडतात. या वनस्पतीची फुले रात्री उमलतात आणि सूर्य उगवताच फांद्यावरून गळून पडतात. पांढऱ्याशुभ्र पाकळ्यांचे व केशरी रंगाच्या देटाचे हे फूल फारच नाजूक असते. त्यामुळे या झाडाची देखील विशेष (Best homemade fertilizer for parijat) काळजी घ्यावी लागते. प्राजक्ताचे झाड (Parijat Plant – How to Grow and Care For it?) हे त्याला येणाऱ्या फ़ुलाप्रमाणेच नाजूक असते तसेच या झाडाला उबदारपणा आणि आर्द्रतेची अधिक गरज असते. शक्यतो थेट सूर्यप्रकाशापासून या झाडाचे संरक्षण करावे लागते नाहीतर प्रखर सूर्यप्रकाशात फुलाच्या नाजूक पाकळ्या जळू शकतात. एकूणच सुपीक माती, पुरेसा सूर्यप्रकाश व पाणी यामुळे हे झाड योग्य पद्धतीने (Organic slow release fertilizer for Parijat Plant both growth & flowering) वाढते. या सगळ्यांसोबतच जर त्याला योग्य खत मिळाले तर प्राजक्ताचे झाड फुलांनी अधिक जास्त बहरु शकते. जर आपल्या देखील घरांत, अंगणात प्राजक्ताचे झाड असेल तर त्याला कोणत्या प्रकारची घरगुती खत (Homemade fertilizer for parijat) वापरावीत, हे पाहूयात(How to Induce flowering in Parijat). 

प्राजक्ताच्या झाडासाठी नेमके कोणते खत वापरावे ? 

१. शेणखत बनवा :- प्राजक्ताचे झाड सुपीक जमिनीत भरभर वाढते. अशी माती, ज्यामध्ये फारसे पाणी साचत नाही. प्राजक्ताच्या झाडासाठी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी, एका भांड्यात ४० ते ५० टक्के माती, ३० टक्के शेणखत आणि २० टक्के वाळू किंवा कोको पीट घेऊन ते सगळे एकत्रित करुन मिसळावे. यानंतर या तयार मिश्रणात एक कप पाणी घालून पुन्हा हे मिश्रण मिसळा. त्यानंतर एका दिवसासाठी सावलीच्या ठिकाणी ठेवा. दुसऱ्या दिवशी आपण हे खत प्राजक्ताच्या झाडाच्या मुळाशी असणाऱ्या मातीत मिसळून घ्यावे. हे खत झाडाच्या मुळाशी टाकल्यानंतर काही दिवसातच आपल्याला झाडावर अधिक फुले  उमललेली दिसून येतील. 

शहाळे पिऊन झाल्यानंतर फेकून देता? अजिबात फेकू नका, पाहा भन्नाट आयडिया, करा घरात डेकोरेशन..

२. कडुनिंबाचे खत :- सगळ्यांतआधी प्राजक्ताच्या झाडाच्या मुळाशी असणाऱ्या मातीवर शेण टाका. शेण टाकल्यानंतर त्यावर कडुनिंबाची पाने पसरवा आणि हलकेच हातांनी दाबून घ्या. त्यानंतर वरून पुन्हा शेणखत घाला आणि शेणाचा दुसरा थर पूर्ण झाल्यावर पुन्हा कडुलिंबाची पाने पसरवून सर्वात शेवटी त्यावर  पाणी घाला. हे असेच किमान तीन ते सहा महिने झाडाच्या मुळाशी तसेच राहू द्या. त्यानंतर वेळोवेळी पाण्याची फवारणी करत रहा. काही महिन्यांनी त्याचे सेंद्रिय खत तयार होईल आणि त्यातून प्राजक्ताच्या झाडाला पोषक तत्वे मिळतील. या उपायामुळे झाड फुलांनी बहरुन जाईल. 

कडक उन्हामुळे तुळस वाळून गेली? तुळस ताजी, टवटवीत राहण्यासाठी ५ उपाय

३. फळांच्या सालीपासून कंपोस्ट खत तयार करा :- एका मातीच्या भांड्यात फळांची साले टाकून ती त्यांचा एक व्यवस्थित थर लावून घ्यावा. यानंतर, या मातीच्या भांड्यात उरलेल्या चहाच्या चहापत्ती सोबतच सुकलेली फुले घालावीत. यानंतर भांड्यात चिमूटभर मीठ टाकून भांडे झाकून आठवडाभर तसेच राहू द्यावे. एका आठवड्यानंतर ते खत म्हणून तयार होईल आणि आपण ते सहजपणे प्राजक्ताच्या झाडांसाठी वापरू शकता. या तयार झालेल्या खतात माती घालूंन आपण प्राजक्ताचे रोप देखील लावू शकता. याशिवाय, आपण हे खत कंटेनरमध्ये तयार करून ते झाडाच्या मातीत देखील मिसळू शकता.

टॅग्स :बागकाम टिप्स