मनी प्लांट (Money Plant) दिसायला सुंदर असून घरातलं वातावरण सकारात्मक, चांगले ठेवण्यासाठीही मनीप्लांट फायदेशीर ठरतात. यामुळे घरातील हवासुद्धा चांगली राहते. मनी प्लांट मातीच्या कुंडीत तसंच पाण्यात कुठेही लावता येतो. पण कुंडीत लावलेल्या मनी प्लांट ग्रोथ अनेकदा थांबते. (Gardening Tips) तुमच्याही घरातला मनी प्लांट व्यवस्थित उगत नसेल तर तुम्ही मनी प्लांट उगवण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. ज्यामुळे मनी प्लांट महिनाभर बहरलेला राहील आणि लांबच लांब वाढत जाईल. (How to Grow Money Plant At Home)
मनीप्लांट पाण्यात लावण्यासाठी २ ते ३ तीन नोड्स असलेले कटींग घ्या. याचा खालचा भाग बॉटलमध्ये व्यवस्थित बुडेल इतकं पाणी त्यात भरा. पाणी खारट नसेल याची काळजी घ्या. पाणी जराही खारट नसावं. तुम्ही फिल्टर केलेलं पाणी वापरू शकता. नंतर हे रोप व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी ठेवा. ज्याठिकाणी थेट ऊन येत असेल.
केस गळणं वाढलंय? आंब्याची कोय 'या' पद्धतीने केसांना लावा, घनदाट-झुपकेदार होतील केस
कुंडीतील मातीत कोकोपीट मिसळून खत तयार करा. नंतर त्यात कटींग लावा, पानांचा भाग मातीत वर असायला हवा. माती ओली झाल्यानंतर त्यात रोज पाणी घाला. त्यानंतर ज्या ठिकाणी थेट ऊन येत असेल अशा ठिकाणी ठेवा.
मनी प्लांटला दाट बनवण्यासाठी प्रूनिंगचा वापर करा
प्रूनिंगने रोपांची वाढ चांगली होईल आणि रोप लांब, दाट होण्यास मदत होईल. सुकलेली पानं प्रूनरच्या मदतीने काढून वेगळी करा. झाडांचा नोडवाला भाग काढू नका. कारण यात नवीन पानं येत नाहीत. जर तुम्ही पाण्यात मनी प्लांट लावला तर हे पाणी २ ते ३ आठवड्यात बदलत राहा. मातीत मनी प्लांट लावले असेल तर या मातीत महिन्यातून एकदा तुम्ही शेणखत घाला. यामुळे मनी प्लांटची वाढ वेगाने होईल. यात केमिकल्सयुक्त फर्टिलायजर्सचा वापर करू नका.
हळद किंवा एप्सम सॉल्ट
मनी प्लांटच्या भरपूर वाढीसाठी कुंडीच्या मातीत हळद किंवा एप्सम सॉल्ट मिसळणं महत्वाचे आहे. असं केल्याने त्यात फंगस येत नाही याशिवाय पोषक तत्व मिळतात याशिवाय पानांची वेगाने वाढ होते आणि घरही चांगले राहते.