जास्वंदाच्या फुलाकडे (Hibiscus) पाहिल्याबरोबरच मनाला प्रसन्न वाटते. देवाला वाहण्यासाठी किंवा घराची शोभा वाढवण्यासाठी लोक घरात जास्वंदाचे रोप ठेवतात. पण अनेकदा असं दिसून येतं की जास्वंदाच्या रोपामध्ये पानांची वाढ भराभर होते त्या तुलनेत फुलं अजिबात येत नाहीत. (How To Make Your Hibiscus Bloom) जास्वंदाचे फुलं अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरली जातात. (How Grow Hibiscus Plant Faster)
केसांच्या वाढीसाठी जास्वंदाच्या फुलाचे कंडिशनर अनेकजण वापरतात. (Gardening Tips)याचे धार्मिक महत्वसुद्धा खास आहे. जास्वंदाच्या रोपाला फुलं येण्यासाठी महागडी खतं आणण्याची काही गरज नाही तुम्ही घरच्याघरी खताचा वापर करू शकता. जास्वंदाला फुलं न येण्याची अनेक कारणं आहेत. (How to Increase Hibiscus Blooms)
गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या रिपोर्टनुसार जास्वंदाच्या रोपाला जवळपास ६ ते ८ तास सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते. पण १२ ते २ च्या दरम्यान कडक उन्हात ठेवू नका. यामुळे रोपाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. रोपाच्या चांगल्या वाढीसाठी पेस्ट कंट्रोलसुद्धा गरजेचे असते. कडुलिंबाचे १० ML तेल १ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसातून एकदा जास्वंदाच्या रोपावर फवारा यामुळे मुंग्या, अळ्या झाडांना लागणार नाहीत.
जास्वंदाच्या रोपाला फुलं न येण्याची कारणं (Reason For Hibiscus Not Flowering)
१) जर रोपाला योग्य प्रमाणात पाणी मिळत नसेल, खत आणि प्रकाश मिळत नसेल, योग्य तापमान नसेल तर फुलांची वाढ व्यवस्थित होत नाही.
गुलाबाला फक्त पानंच येतात-फुलं येत नाही? १० रूपयांचा 'हा' पदार्थ मिसळा, ७ दिवसांत फुलंच फुल येतील
२) या झाडाला खत घालताना त्यावरील इंस्ट्रक्शन्स वाचून घ्या. जेणेकरून नुकसान होणार नाही.
३) जास्वंदाचे रोप ज्या भांड्यात लावत आहात त्यात पाणी जिरण्यासाठी व्यवस्थित होल्स असतील याची खात्री करा.
जास्वंदाचे रोप चांगले वाढण्यासाठी अशी घ्या काळजी (Secrets to increase flowering and get big sized flowers in hibiscus)
जास्वंदाच्या रोपाला फुलं येत नसतील तर तुम्ही ही फुलं सुकलेली पानं कापून टाका जेणेकरून नवीन फुलं चांगली येतील. दर दोन महिन्यांनी न विसरता कटिंग करा. पाण्याचे प्रमाण योग्य असावे. मातीत मॉईश्चर राहील इतकंच पाणी घाला. जास्त पाण्यात रोप व्यवस्थित उगवणार नाही. रोपाची माती जितकी पोषक असेल तितकीच फुलांची वाढ चांगली होईल.
दर महिन्याला थोडी थोडी माती बदलत राहा. जास्वंदाला फुलं येण्यासाठी त्यात Zyme खत घाला. छोटं रोप असेल तर १ चमचा आणि मोठं रोप असेल १.५ चमचा खत घाला. रोपाच्या चांगल्या वाढीसाठी त्यात एप्सम सॉल्ट तुम्ही घालू शकता. ज्यामुळे हेल्दी फुलं येतील. त्यात ऑर्गेनिक खत घालायला विसरू नका. ऑर्गेनिक खत घातल्याने रोप वेगाने वाढते. यात तुम्ही केळीचे सालं, दूध पावडर आणि पाण्याचे लिक्विड वापरू शकता.