तुळस, गुलाब या झाडांच्या मागोमाग घरोघरी असणारं झाड म्हणजे जास्वंद. मोठा, छोटा, डबल लेअरचा, एकेरी किंवा पाच पाकळ्यांचा असे जास्वंदाचे अनेक प्रकार आहेत. बरं यातही एकेका प्रकारात अनेक रंगांमध्ये जास्वंद उपलब्ध असतात. देवपुजेनंतर घरच्या देवांना वाहण्यासाठी एखादं जास्वंदाचं फुलं असलं तरी काम होतं. त्यामुळेच तर घरोघरी अगदी आवर्जून जास्वंद लावला जातो आणि वाढवला जातो. शु फ्लॉवर (shoe flower) असं जास्वंदाला इंग्रतीमध्ये म्हणतात. खरंतर हे झाड वाढविताना त्याची खूप जास्त काळजी घेण्याची किंवा त्याच्यावर खूप वेळ खर्च करण्याची अजिबातच गरज नाही. पण तरीही कधीकधी काही गोष्टी आपल्याकडून चुकतात आणि त्यामुळे मग या झाडाला फुलं येणंच बंद होतं. असं होऊ नये म्हणून जास्वंदाची काळजी (Gardening tips for Hibiscus plant in marathi) कशी घ्यावी, याविषयीच्या काही गोष्टी...
जास्वंदाची अशी घ्या काळजी
How to take care of Hibiscus plant
- ४ ते १८ इंचाच्या कोणत्याही कुंडीत जास्वंद लावता येतो. जास्वंद लावताना मातीमध्ये शेणखत किंवा गांडूळ खत, कोकोपीट, वाळू यांचे प्रमाण देखील सगळे मिळून जवळपास ५० टक्के ठेवावे. ५० टक्के माती असावी.
- जास्वंदाच्या झाडाला भरपूर सुर्यप्रकाशाची गरज आहे. त्यामुळे हे झाड शक्यतो जिथे भरपूर उन येईल तिथेच ठेवावे. कधी कधी नुसती कुंडीची जागा बदलून तिला उन्हात ठेवल्यानेही जास्वंदाचा बहर वापस येतो आणि त्याला भरपूर फुले येतात.
- उन्हाळ्यात या झाडाला भरपूर पाणी घाला. पण तेच प्रमाण हिवाळा आणि पावसाळ्यात मात्र एकदम कमी करा. कुंडीतली माती ओली असेल, तर जास्वंदाला पाणी घालणे टाळा. अतिपाणी झाल्यानेही झाडांच्या, फुलांच्या वाढीवर परिणाम होतो.
video credit- Gardenig upbeat
- कुंडीत जेव्हा आपण एखादे झाड लावतो तेव्हा त्या झाडाला ठराविक अंतराने खत देण्याची गरज असते. जास्वंदाला कांद्याचे पाणी, गांडूळ खत असे काही काही नेहमी द्यावे. जेणेकरू व्यवस्थित पोषण मिळून झाडाची चांगली वाढ होते.
- जास्वंदाला जेवढ्या जास्त फांद्या असतात, तेवढीच जास्त फुलं येतात. त्यामुळे जास्वंदाला वेळोवेळी छाटले पाहिजे. त्यामुळेही फुलांचा बहर येऊ शकतो.
जास्वंदाच्या झाडाला असं द्या खत...
Fertilizer for Hibiscus plant to get more flower
- जास्वंदाला चांगली फुलं यावीत यासाठी जास्वंदाला दर १५ दिवसातून एकदा कांद्याची टरफले, केळीच्या सालीचे पाणी आलटून पालटून द्यावे. असे पाणी तयार करण्यासाठी कांद्याची टरफले किंवा केळीची साले रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी साल काढून टाका. जेवढं पाणी बादलीत असेल, तेवढंच साधं पाणी त्यात टाका आणि हे पाणी झाडांना द्या. फुलांचा बहर येईल.
- उकडलेल्या बटाट्यांची साले जास्वंदाच्या मातीत खाेचून द्या. वरून पुन्हा मातीचा थर द्या.
- त्याचप्रमाणे केळ्यांची सालेही कुंडीतल्या मातीत खोचा.. या उपायानेही जास्वंदाला छान फुले येतील.