Join us  

जास्वंदाचे रोपटे नुसतेच वाढते, पण फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा एक खास गोष्ट; फुलांनी बहरेल रोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 11:51 AM

How to Care for a Hibiscus Plant : बऱ्याचदा आपण घरात जास्वंदाचे रोपटे लावतो, पण त्याला फुलेच येत नसतील तर..?

प्रत्येक घरात एक छोटीशी बाग असतेच. त्या बागेत तुळस, गुलाब आणि कोरफड असते. यासह मोगरा आणि जास्वंदाचे (Hibiscus) देखील रोपटे असते. जास्वंदाच्या फुलांचा वापर फुलांचा हार किंवा देवपुजेनंतर घरच्या देवांना वाहण्यासाठी होतो. पण रोज बाजारातून जास्वंद आणण्यापेक्षा आपण घरातच रोपटे लावू शकता. पण बऱ्याचदा त्याला फुलं येत नाही. किंवा कमी फुल येतात. मग आपण रोपट्याची काळजी घेताना कुठे चुकतोय? असा प्रश्न निर्माण होतो.

जास्वंदाचे रोपटे लावले की झाडाची जास्त काळजी घ्यावी लागत नाही (Gardening Tips). पण जर झाडाला फुलच येत नसेल तर, आपण मातीत एक गोष्ट मिसळू शकता. यामुळे नक्कीच जास्वंदाला फुलं येतीलच शिवाय रोपटे फुलून बहरेल. त्यामुळे जास्वंदाचे झाड लावल्यानंतर कोणती काळजी घ्यावी? फुलं येण्यासाठी काय करावे? पाहा(How to Care for a Hibiscus Plant).

जास्वदांच्या रोपट्याला फुलं यावी यासाठी मातीत मिसळा एक गोष्ट

- झाडांच्या वाढीसाठी खत महत्वाचे ठरते. खतामुळे झाडाची योग्य वाढ होते. शिवाय झाडांवर भरपूर फुले, फळं येतात. जर जास्वंदाच्या रोपट्याला योग्यरित्या फुले येत नसतील तर, आपण जाइम खताचा वापर करू शकता. या खतामुळे झाडांना योग्य पोषण मिळते. ज्यामुळे झाडांची योग्य वाढ होते.

तुळस सुकेल-पानं गळतील, तुळशीच्या बाजूला लावू नयेत ३ रोपं, कारण..

- जाइम खताचा वापर थेट करू नका. त्यात ५० टक्के माती मिक्स करा. शिवाय झाडाला भरपूर सूर्यप्रकाशात ठेवा. कधी कधी नुसती कुंडीची जागा बदलून तिला उन्हात ठेवल्यानेही जास्वंदाचा बहर वापस येतो.

- झाडाला अतिप्रमाणात पाणी घालू नका. यामुळे फुलांच्या वाढीवर परिणाम होतो. कुंडीतली माती जर ओली असेल तर, जास्त पाणी घालू नका. गरजेनुसार पाणी घाला.

मनी प्लांट पाण्यात लावावा की मातीत लावणं योग्य? मनी प्लांट भरपूर वाढायचा तर..

- जास्वंदाच्या झाडाची माती दर ५ ते ६ महिन्यांनी बदलत राहा. रोपट्याला नवीन  खत आणि माती मिळाल्याने रोपटे अधिक बहरेल.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल