घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहावं यासाठी घरात झाडं लावली जाता. फेंगशुईमध्ये बांबू प्लांटला ( Bamboo Plant) लकी प्लांट मानले जाते. लकी असल्यामुळे हे झाड अनेक घरांमध्ये ठेवले जाते. घरात लावल्या जाणाऱ्या झाडांपैकी बांबू प्लांट एक आहे. (How to Take Care of Bamboo Plant in Water)अनेकजण घराची शोभा वाढवण्यासाठी आणि घर सुंदर दिसण्यासाठी हे रोप घरात ठेवतात. (Gardening Tips)
बांबू प्लांट ज्या उत्साहाने नर्सरीतून घरी आणले जाते. (How to Grow Bamboo Plant at Home) त्या उत्साहात ते घरी वाढवता येत नाही. व्यवस्थित काळजी न घेतल्यास हे झाड कोमेजू लागते. बांबू प्लांटला उन्हाची आवश्यकता नसते. बांबू प्लांटची वाढ व्यवस्थित व्हावी यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How to Take Care of Bamboo Plant)
खोलीतच ठेवा (How to Grow Lucky Bambo Plant)
बांबू प्लांट लकी मानले जाते पण हे तुम्ही जितकं बाहेर न ठेवता घराच्या आत ठेवाल तितकंच ते चांगलं राहिल कारण हे झाड नाजूक असते. म्हणूनच थेट उन्हात न ठेवता आतल्या बाजूला ठेवावे. उन्हामुळे झाडं लवकर सुकतात आणि मरून जातात. झाडं ही नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवायला हवीत. ज्यामुळे रोपांची मुळं मजबूत होतात. म्हणूनच पाण्यात ठेवले जाते.
इतरांचा मनी प्लांट भरभर वाढतो, तुमचा वाढत नाही? किचनमधला ‘हा’ पदार्थ वापरा, मनी प्लांट होईल हिरवागार
योग्य दगडांची निवड
बांबू प्लांट पाण्यात लावले जाते. म्हणून सपोर्टसाठी दगड घालून ठेवणं गरजेचं असतं. एका काचेच्या पॉटमध्ये पांढरे किंवा काळ्या रंगाचे दगड घालून या झाडांच्या आजूबाजूला ठेवले जाते. ज्यामुळे हे झाड पाण्यात व्यवस्थित ग्रो होते. अनेकजण हे झाड मातीतही लावतात. तर तुम्ही हे झाड मातीत लावत असाल तर जास्त पाण्याचा वापर करू नका.
झाडाला फुलंच लागत नाही? १० रूपयांच्या शेंगदाण्यांचे करा खत; फुलंच फुले येतील-किडही लागणार नाही
वेळेवर पाणी बदलत राहा
बांबूचे झाड पाण्यातच लावले जाते. एका काचेच्या पॉटमध्ये या रोपाची मुळे ओली राहतील इतकं पाणी भरलं जातं. या पॉटचे पाणी दर 15 दिवसांनी बदलत राहायला हवे नाहीतर त्यातून दुर्गंध येऊ लागतो. जर 15 दिवसांनी पाणी बदलले तर झाडाची चांगली वाढ होईल आणि जास्तवेळ बहरलेलं राहील आणि रोप हिरवेगार राहील.