रोपं लावण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्यांचा वापर करतो. आपल्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये आपण अनेक मटेरियल किंवा आकाराच्या कुंड्यांमध्ये रोपं लावतो. रोपं कोणतेही असो ते छानशा कुंडीत लावल्याने देखील त्याची शोभा अधिक वाढते. आजकाल बाजारांत वेगवेगळ्या मटेरियलच्या, आकाराच्या, असंख्य साईज, शेप्सच्या कुंड्या अगदी सहज पाहायला मिळतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्यांमध्ये रोपं लावल्याने ते अधिकच सुंदर दिसते. असे असले तरीही रोपांसाठी मातीच्या कुंड्या वापरण्याची पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. मातीच्या कुंड्यांमध्ये रोपांचे आरोग्य आणि सौंदर्य अधिक चांगले राखले जाते असे मानले जाते(What is the best cleaner for plant pots).
रोपांसाठी मातीच्या कुंड्यांचा वापर करताना अनेक अडचणी देखील येतात. या मातीच्या कुंड्या पावसाळ्यात कायम ओल्याच राहतात आणि पाणी शोषून घेतात, त्यामुळे मुळांना जास्तीचे पाणी मिळून रोपं खराब होतात. त्याचबरोबर या मातीच्या कुंड्यांवर शेवाळे जमा होऊन या कुंड्यांचा पृष्ठभाग खराब होतो. याचा त्या रोपांवर देखील परिणाम होतो. मातीच्या कुंड्या स्वच्छ (how to clean garden pots) करण्यासाठी आपण काही सोप्या टिप्सचा वापर करु शकतो( How to Clean and Disinfect Plant Containers).
मातीच्या कुंड्यांची स्वच्छता कशी ठेवावी ?
१. कुंड्या पाण्याने स्वच्छ धुवा :- जर मातीच्या कुंड्यांवर बाहेरुन फार मोठ्या प्रमाणात घाण आणि शेवाळे साचले असेल तर आपण पाण्याचा वापर करुन या मातीच्या कुंड्या स्वच्छ करु शकतो. या कुंड्या पाण्यात थोड्यावेळासाठी भिजत ठेवून त्यानंतर ब्रशच्या मदतीने हळुहळु घासून कुंड्या स्वच्छ करुन घ्याव्यात.
पावसाचे पाणी कुंड्यांमध्ये साचून रोपं सडतात? ५ सोपे उपाय, पावसाळ्यात अशी घ्या रोपांची काळजी...
२. ब्लिच आणि पाणी :- कुंड्या स्वच्छ करण्यासाठी आपण ब्लिचचा देखील वापर करु शकता. एका बाऊलमध्ये २ मोठे टेबलस्पून ब्लिचिंग पावडर घेऊन त्यात गरजेनुसार पाणी मिक्स करून त्याची पातळसर पेस्ट तयार करुन घ्यावी. ही पेस्ट कुंड्यांना बाहेरून लावून घ्यावी त्यानंतर पुढचे ३० मिनिटे ही पेस्ट कुंड्यांच्या पृष्ठभागावर तशीच राहू द्यावी. नंतर ब्रशच्या मातीने हळुहळु घासून कुंड्यांवरील घाण काढून टाकावी. त्यानंतर भरपूर पाण्याचा वापर करुन हे ब्लिच स्वच्छ धुवून घ्यावे, जेणेकरून ब्लिचचे पांढरे डाग कुंड्यांवर राहणार नाही.
३. व्हिनेगर आणि पाणी :- आपण व्हाईट व्हिनेगरचा वापर करुन कुंड्या स्वच्छ करु शकता. १ कप व्हिनेगर आणि २ कप पाणी यांचे मिश्रण तयार करा आणि ते कुंड्यांवर लावा. व्हिनेगर नैसर्गिकरीत्या शेवाळे काढून टाकते. हे मिश्रण कुंड्यांवर लावा आणि काही वेळ ते तसेच राहू द्यावे आणि नंतर ब्रशने स्वच्छ करा. यानंतर कुंड्या स्वच्छ धुवून घ्याव्यात.
मनी प्लांट्ससाठी लागणारी मॉस स्टिक तयार करा घरच्याघरी, महागडी मॉस स्टिक मिळेल स्वस्त...
४. कुंड्या उन्हात वाळवा :- कुंड्या नीट स्वच्छ केल्यानंतर त्या उन्हात वाळवणे खूप गरजेचे आहे. कुंड्यात उरलेले कोणतेही शेवाळे किंवा बॅक्टेरिया सूर्यप्रकाशात ठेवून मारले जाऊ शकतात. उन्हात वाळवल्याने कुंड्या लवकर सुकतात आणि पूर्णपणे स्वच्छ होतात.
५. कुंड्यांची नियमित देखभाल :- कुंड्या स्वच्छ केल्यानंतर, पुढे शेवाळाची समस्या टाळण्यासाठी कुंड्यांची नियमित काळजी घ्या. कुंड्यांच्या सभोवतालची माती वेळोवेळी बदला आणि कुंड्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था असल्याची खात्री करा. याशिवाय कुंड्या सुंदर बनवण्यासाठी तुम्ही गेरूच्या रंगाने या कुंड्या रंगवू शकता.