Lokmat Sakhi >Gardening > बागेतलं आर्टिफिशियल ग्रास स्वच्छ करण्याच्या ३ टिप्स, ग्रास राहील मेंटेन- बाग दिसेल स्वच्छ सुंदर

बागेतलं आर्टिफिशियल ग्रास स्वच्छ करण्याच्या ३ टिप्स, ग्रास राहील मेंटेन- बाग दिसेल स्वच्छ सुंदर

Cleaning Tips For Artificial Lawn Carpet: टेरेसमध्ये, गार्डनमध्ये टाकलेलं आर्टिफिशियल ग्रास स्वच्छ करण्यासाठी या काही टिप्स....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2024 09:06 AM2024-03-01T09:06:21+5:302024-03-01T09:10:01+5:30

Cleaning Tips For Artificial Lawn Carpet: टेरेसमध्ये, गार्डनमध्ये टाकलेलं आर्टिफिशियल ग्रास स्वच्छ करण्यासाठी या काही टिप्स....

How to clean artificial green grass, Cleaning tips for artificial lawn carpet | बागेतलं आर्टिफिशियल ग्रास स्वच्छ करण्याच्या ३ टिप्स, ग्रास राहील मेंटेन- बाग दिसेल स्वच्छ सुंदर

बागेतलं आर्टिफिशियल ग्रास स्वच्छ करण्याच्या ३ टिप्स, ग्रास राहील मेंटेन- बाग दिसेल स्वच्छ सुंदर

Highlightsत्याची स्वच्छता योग्य वेळी, योग्य पद्धतीने झाली नाही, तर मग मात्र त्यात घाण अडकून बसते आणि बारीक बारीक किडेही होतात.

बागेचं साैंदर्य खुलविण्यासाठी हल्ली आर्टिफिशियल ग्रास किंवा लॉन टाकलं जातं. खासकरून जेव्हा गॅलरी किंवा टेरेसमध्ये झाडं लावलेली असतील तेव्हा त्या बाल्कनीमध्ये, टेरेसमध्ये असं गवत टाकतात. यामुळे बागेचा लूक खरोखरच खूप बदलतो आणि घराचा एक छोटासा कोपरा पुर्णपणे हिरवागार- रिफ्रेशिंग होऊन जातो. पण बागेच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या कृत्रिम गवताची स्वच्छता कशी करायची, असा प्रश्न अनेकांना पडतो (How to clean artificial green grass). कारण त्याची स्वच्छता योग्य वेळी, योग्य पद्धतीने झाली नाही, तर मग मात्र त्यात घाण अडकून बसते आणि बारीक बारीक किडेही होतात. (Cleaning tips for artificial lawn carpet)

आर्टिफिशियल लॉनची स्वच्छता कशी करायची?

 

१. दररोज आपण घर, अंगण झाडतो, त्याचप्रमाणे दररोज आर्टिफिशियल लॉन किंवा कार्पेटही झाडावे. हे लॉन झाडण्यासाठी खराटा वापरावा. किंवा बाथरूम घासण्याचा जो लांब ब्रश असतो तो वापरावा.

महिलांनी स्वयंपाकघरात स्लिपर का घालावी? डॉक्टर सांगतात बहुसंख्य बायकांचं 'हे' दुखणं थांबेल

यामुळे ग्रासमध्ये अडकलेली घाण, माती, पालापाचोळा व्यवस्थित स्वच्छ होईल. दोन ते तीन दिवसांतून एकदा तरी अशी स्वच्छता करावीच.

 

२. तुम्ही लॉन जर खूप कमी भागात टाकलेले असेल तर दोन ते तीन महिन्यातून एकदा ते उचलून घ्यावे. त्याच्या खालची माती झाडून घेऊन फरशी स्वच्छ पुसून घ्यावी. तसेच लॉनही साबणाच्या पाण्याने व्यवस्थित धुवावे. कपडे धुण्याचा ब्रश वापरून लॉन घासून स्वच्छ केले तरी चालते.

भाजी, वरण करताना त्यात कोथिंबीर कधी घालावी? बघा खास टिप्स- वाचा कोथिंबीर खाण्याचे फायदे

३. जर लॉन खूप मोठ्या जागेत टाकलेले असेल आणि ते सहजासहजी उचलून त्याची स्वच्छता करणे शक्य नसेल तर अशावेळी महिन्यातून एकदा लॉनवर साबणाचे पाणी टाकावे आणि ते घासून स्वच्छ करावे. 
 

Web Title: How to clean artificial green grass, Cleaning tips for artificial lawn carpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.