Lokmat Sakhi >Gardening > कुंडीतील रोपांसाठी शेणखत वापरण्याची योग्य पद्धत, रोपं फळाफुलांनी येतील बहरून...

कुंडीतील रोपांसाठी शेणखत वापरण्याची योग्य पद्धत, रोपं फळाफुलांनी येतील बहरून...

Correct Way to Use Gobar Fertilizer For Plants : ways to use cow dung, or gobar, as fertilizer for plants : How to Correctly Use Cow Dung as a Fertilizer For Plants : गायीचे शेण रोपांसाठी फायदेशीर असले तरीही ते वापरण्याची योग्य पद्धत माहिती करुन घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2024 09:00 IST2024-12-19T09:00:00+5:302024-12-19T09:00:02+5:30

Correct Way to Use Gobar Fertilizer For Plants : ways to use cow dung, or gobar, as fertilizer for plants : How to Correctly Use Cow Dung as a Fertilizer For Plants : गायीचे शेण रोपांसाठी फायदेशीर असले तरीही ते वापरण्याची योग्य पद्धत माहिती करुन घ्या...

How to Correctly Use Cow Dung as a Fertilizer For Plants Correct Way to Use Gobar Fertilizer For Plants ways to use cow dung, or gobar, as fertilizer for plant | कुंडीतील रोपांसाठी शेणखत वापरण्याची योग्य पद्धत, रोपं फळाफुलांनी येतील बहरून...

कुंडीतील रोपांसाठी शेणखत वापरण्याची योग्य पद्धत, रोपं फळाफुलांनी येतील बहरून...

आपल्या देशात शेती आणि पशुपालन हे दोन्ही जोडधंदे फार मोठ्या प्रमाणांवर केले जातात. पशुपालन करत असताना या पशूंचे विशेषतः गायींचे शेण हे शेतीसाठी उत्कृष्ट सेंद्रिय खत मानले जाते. गायीचे शेण (Correct Way to Use Gobar Fertilizer For Plants) हे केवळ झाडांचे पोषणच करत नाही तर मातीच्या गुणवत्तेची देखील विशेष काळजी घेतात. अशा परिस्थितीत बहुतेक लोक शेणापासून तयार केलेले खत झाडांसाठी वापरतात. गायीचे शेण रोपांच्या वाढीसाठी वापरण्यासोबतच त्यापासून गौऱ्या, वाळलेल्या शेणखताचे दिवे, रोपांसाठी कुंड्या आणि इतर अनेक गोष्टीं तयार केल्या जातात(How to Correctly Use Cow Dung as a Fertilizer For Plants).

शेण, मुत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकापासून तयार होणा-या खताला शेणखत म्हणतात. आजकाल शेणखतं हे नर्सरी किंवा कोणत्याही दुकानांत अगदी सहजपणे विकत मिळते. आपण आपल्या बाल्कनी किंवा गार्डनमधील (ways to use cow dung, or gobar, as fertilizer for plants) रोपांच्या चांगल्या वाढीसाठी शेणखताचा वापर करु शकतो. परंतु शेणखताचा वापर करतांना नक्की कोणत्या प्रकारचे शेणखतं रोपांच्या कुंडीत घालावे ते पाहूयात.

१. रोपांच्या कुंडीत शेण घालताना कोणत्या प्रकारच्या शेणाचा वापर करावा... 

रोपांच्या चांगल्या वाढीसाठी शेणाचा वापर करताना आपण कोणते शेण घालावे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण कोरडे आणि ओले अशा दोन्ही प्रकारच्या शेणाचे रोपांवर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. ताजे शेण रोपांमध्ये थेट घातल्याने रोपांचे नुकसान होऊ शकते. याचे कारण असे की त्यात नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते, जे रोपांच्या मुळांना जाळू शकते. याचबरोबर मातीची आम्लता देखील वाढवू शकते. याशिवाय ताज्या शेणात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया देखील असतात, जे झाडांच्या वाढीस हानी पोहोचवतात.

कुंडीत दुर्वा लावण्याची पाहा सोपी ट्रिक, छोट्याशा कुंडीतही वाढेल दाट हिरवळ-देवाला वाहा ताज्या दुर्वा!

२. रोपांसाठी कोरड्या शेणाचा वापर करा... 

ओले शेण वाळवल्यावर त्यातील नायट्रोजनचे प्रमाण कमी होते. शेणाचे हळूहळू विघटन केल्याने, ते मातीमध्ये पोषक तत्वे सोडते, ज्यामुळे रोपांना  दीर्घकालीन फायदे मिळतात. वाळलेल्या शेणामुळे झाडाची वाढ आणि मातीची गुणवत्ता वाढण्यास अधिक मदत होते. म्हणून, रोपांच्या कुंडीत किंवा मातीमध्ये कोरडे शेण घालणे अधिक फायदेशीर ठरते. 

कुंडीतल्या रोपांसाठी केमिकल्सयुक्त कीटकनाशक नको, करा १ घरगुती उपाय, कीड होईल गायब...

तुळशीच्या रोपावर शिंपडा हे ‘पिवळं’ पाणी, तुळस कधीच कोमेजणार नाही- हिरवीगार तुळस वाढवेल प्रसन्नत

३. गायीच्या शेणाचा रोपांसाठी वापर कसा करावा... 

गायीच्या शेणाचा रोपांसाठी वापर करताना सर्वात आधी एक मोठा खड्डा खणून त्यात शेण साठवून ठेवावे. अशा प्रकारे शेणाचे कंपोस्टिंग केल्याने ताज्या शेणात असलेले नायट्रोजन आणि अनेक घटक हळुहळु विघटित होत जातात. यासोबतच, यातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, जेणेकरुन रोपांना फक्त पोषक आणि महत्त्वाचेच आवश्यक घटक मिळतील. किमान २ ते ३ महिन्यांसाठी हे शेण असेच खड्ड्यात साठवून ठेवावे, त्यानंतरच गार्डन किंवा बाल्कनीमधील रोपांसाठी वापरावे. सुकलेले गायीचे शेण आपण थेट रोपांच्या कुंडीत घालू शकतो.

Web Title: How to Correctly Use Cow Dung as a Fertilizer For Plants Correct Way to Use Gobar Fertilizer For Plants ways to use cow dung, or gobar, as fertilizer for plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.