आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात काही रोपं, झाडं ही हमखास असतातच, त्यापैकीच एक म्हणजे नागवेलीचा वेल. नागवेलीला खायचे किंवा विड्याचे पानं असं देखील म्हटलं जात. हिरवीगार, लांबलचक नागवेलीच्या पानांची वेल बाल्कनीची शोभा वाढवण्याबरोबरच अनेक कामांसाठी फायदेशीर ठरते. नागवेलीच्या पानांचा वेल फक्त सजावटीसाठीच नाही, तर ती आपल्या (How To Do Use Rice Water For Increase Leaf Size Paan Plant) पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. नागवेलीची पाने (Using Rice Water for Plants) हवा शुद्ध करतात आणि ऑक्सिजन देतात, असे एक ना अनेक फायदे असलेला नागवेलीच्या पानांचा वेल लावणे सोपे असते परंतु त्याची निगा राखणे फार कठीण असते. या नाजूक पानांच्या वेलीची तितकीच नाजूक पद्धतीने काळजी घ्यावी लागते(How to Use Rice Water for Plants).
नागवेलीच्या पानांची वेल जर आपल्याला लांबलचक, हिरवीगार हवी असेल तर तिची काळजी घेण्याची योग्य पद्धत समजून घेतली पाहिजे. आपण पाहिले असेल की, बाल्कनीत किंवा फ्लॉवर बेडमध्ये लावलेल्या नागवेलींची वेल वाढत नाही किंवा त्याच्या पानांचा आकार देखील लहानच असतो. असे होऊ नये म्हणून आपण काही महत्वाच्या टिप्स समजून घेऊयात. या टिप्सचा वापर करुन आपल्या बाल्कनीत नागवेलीचा वेल अगदी हिरवागार करु शकता, तसेच नागवेलीची पानेही अगदी लांबलचक होण्यास मदत मिळते.
नागवेलींच्या पानांचा आकार आणि वेल वेगाने वाढण्यासाठी उपाय...
नागवेलींच्या पानांचा आकार आणि वेल वेगाने वाढण्यासाठी आपण तांदुळाच्या पाण्याचा वापर करु शकतो. खरंतर, तांदूळ पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर ते पाणी निरुपयोगी समजून आपण फेकून देतो. परंतु हे पाणी फेकून न देता आपण ते नागवेलीच्या वेलींना घालू शकतो. यामुळे विड्याच्या पानांचा वेल दुप्पट वेगाने वाढतो. इतकेच नाही तर पानांचा आकार वाढून पानं देखील हिरवीगार होतात.
मोगरा फुलला! पाटीवर लिहिण्याचा खडू करेल कमाल, पांढऱ्याशुभ्र कळ्यांचा बहर - सुगंध दरवळेल दारी...
तांदुळाच्या पाण्यांत रोपांच्या वाढीसाठी काही आवश्यक सूक्ष्मजीव असतात. जे मातीची सुपीकता वाढविण्यासोबतच रोपांच्या वाढीसाठी देखील फायदेशीर ठरतात. याव्यतिरिक्त, त्यात असलेले नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम विड्याची पाने मोठी आणि चमकदार बनवतात.
नागवेलीच्या वेलींसाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर कसा करावा...
१. तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर जे पाणी उरते ते फेकून न देता थेट नागवेलीच्या वेलीला घालावे. नागवेलीचे रोप जर तुम्ही मातीत कुंडीमध्ये लावले असेल तर मातीत हे पाणी घातल्याने ते मुळांना मिळते.
घरभर धूळ, कितीही पुसा धूळ कमीच हाेत नाही? लावा ७ रोपं, घरात वाटेल फ्रेश - प्रदूषण गायब...
२. याचबरोबर, तांदुळाचा भात करताना आपण तांदुळात पाणी घालून भात शिजवतो. भात शिजत असताना उकळते पाणी तुम्ही एका बाऊलमध्ये काढून ते थोडे थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. हे पाणी थंड झाल्यावर त्यात कपभर साधे पाणी ओतून मिश्रण तयार करून घ्यावे. हे तयार पाणी नागवेलीच्या वेलींना घातल्याने, विड्याची पाने लांबलचक, हिरवीगार होतात तसेच त्यांचा आकार देखील वाढतो. यासोबतच वेलीची वाढ देखील भरभर होते.