Join us  

मोगऱ्याला फुलं कमी पानचं जास्त येतात? रोपातं हा पदार्थ घाला, मोगऱ्याच्या फुलांनी बहरेल बाल्कनी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 4:09 PM

How to Get Lots Of Flowers in (Mogra) Jasmine Plant : मोगऱ्याचा सुगंध फक्त बाल्कनीच नाही तर संपूर्ण घरातील वातारवरण सकारात्मक आणि आनंददायी ठेवतो.

मोगऱ्याचे फुलं फक्त दिसायला सुंदर दिसत नाही तर त्याचा सुगंधही खूप आकर्षक असतो. म्हणूनच बरेच लोक आफल्या टेरेसमध्ये, गार्डनमध्ये मोगऱ्याचे रोप लावतात. ( Tips To Increase Number Of Flowers on Your Mogra Plant) जेणेकरून त्यांचे गार्डन सुंदर आणि सुशोभित दिसेल. मोगऱ्याचा सुगंध फक्त बाल्कनीच नाही तर संपूर्ण घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंददायी ठेवतो. (How to get Maxium Flowers in Mogra Plant)

घरात एअर फ्रेशरचाही वापर करावा लागणार नाही. ( How to Grow And Care Jasmine Plant At Home) मोगऱ्याची फुलं येत नसतील तर घरात आपोआप सुगंध दरवळत राहील. अनेकदा लोकांना तक्रार असते की, मोगऱ्याची फुलं व्यवस्थित येत नाही. काहीवेळा फुलं येत नाहीत. ही समस्या टाळण्यासाठी मोगऱ्याच्या फुलाची देखभाल करण्याच्या सोप्या टिप्स लक्षात घ्यायला हव्यात.

बाल्कनीतल्या रोपांना फुलंच येत नाही? फक्त 'हा' पांढरा पदार्थ मिसळा, भराभर फुलं येतील

ऊन्हाळ्याच्या दिवसांत काळजी घ्या

मोगऱ्याच्या फुलांना योग्य प्रमाणत ऊन्हाची आवश्यकता असते.  रोज कमीत कमी ५ ते ६ तास  ऊन्हात ठेवा.  जास्तीत जास्त ऊन मिळाल्यामुळे रोपं चांगली राहतात आणि फुलांचा विकासही चांगला होतो. 

योग्य प्रमाणात पाणी

लोक अनेकदा सुकलेल्या रोपांना पाणी देतात. पण गरजेपेक्षा जास्त पाणी घातल्यामुळे झाडं कमकुवत होऊ शकतात.  यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात  पाणी घाला आणि मातीने पाणी शोषून घेतल्यानंतर पुन्हा पाणी  घाला.  माती पाणी शोषून घेत नसेल तर असं दिसून येतं की वरचा भाग पाण्याने भरला आहे. 

फर्टाईल माती

 फुलं चांगली येण्यासाठी तुम्ही फर्टाईल सॉईलचा वापर करू शकता. यामुळे कमीत कमी १ किंवा २ वेळा चांगली फुलं येतील.  काही दिवसांनी फुलं कोमेजू लागतील. गायचे शेण तुम्ही जैविक खताच्या स्वरूपात मातीत मिसळू शकता. मोगऱ्याच्या रोपात ५ ते ८ पीएच फर्टाईल मातीचा वापर करू शकता. शेणं, वर्म कॉम्पोस्ट, कोकोपीट आणि भुरभूरीत माती मिसळणं योग्य ठरेल.

वातावरणाची काळजी घ्या

मोगऱ्याच्या झाडासाठी कमीत कमी १५ ते ३५ डिग्री सेल्सियस तापमान उत्तम ठरते. वातावरणानुसार मोगऱ्याच्या रोपाची काळजी घ्या. योग्य तापामानात ठेवा. 

टॅग्स :बागकाम टिप्स