Join us  

गॅलरीतल्या कुंडीतही फुलेल मोगरा, लहानशा रोपालाही येतील भरपूर फुलं- करा फक्त ४ गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2024 10:00 AM

How To Get Maximum Flowers In Mogra Plant : मोगऱ्याचे रोप सुगंधीत फुलांनी बहरेल, फक्त रोपटे लावताना..

घरामध्ये लोकांना विविध प्रकारची रोपं लावायला आवडतात. सुगंधित फुलांमध्ये मोगऱ्याचं रोप अनेकजण लावणं पसंत करतात. पांढऱ्याशुभ्र दिसणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध मनाला शांती देतो. घरात किंवा अंगणात मोगऱ्याचं रोप लावल्यास घरभर याचा सुगंध दरवळतो. त्यामुळे घराबाहेर कुंडीत किंवा जमिनीत मोगऱ्याचे रोपटे लावले जाते. मोगऱ्याचे रोपटे लावल्यानंतर त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. जर योग्य काळजी नाही घेतल्यास रोपाला फुलं येणं कमी होतं. रोपावर अगदी ३-४ मोजकीच फुलं दिसू लागतात (Gardening Tips).

आपल्या घरातलं मोगऱ्याचं रोप फुलांनी बहरून जावं असं वाटत असेल तर, ४ गोष्टी फॉलो करा. या टिप्समुळे मोगऱ्याचे रोपटे फुलांनी बहरेल शिवाय घरभर सुगंध दरवळेल(How To Get Maximum Flowers In Mogra Plant).

सूर्यप्रकाश गरजेचा

मोगऱ्याचे रोपटे तेव्हाच बहरेल, जेव्हा रोपट्याला उत्तमप्रकारे सूर्यप्रकाश मिळेल. फक्त १-२ तासांच्या सूर्यप्रकाशात मोगऱ्याचे रोपटे उत्तमरित्या फुलेल. पण जास्त वेळ सूर्यप्रकाशात ठेवू नका. यामुळे रोपटे सुकून जाईल.

प्लास्टिकच्या कुंडीत लावू नका मोगरा

आजकाल बरेच जण मातीच्या कुंडी सोडून प्लास्टिकच्या कुंडीत रोपटे लावतात. जे रोपट्यांसाठी उचित नाही. यामुळे रोपटे खराब होऊ शकते. मोगऱ्याचे रोपटे लावताना प्लास्टिक नसून, मातीच्या कुंडीत लावा. प्लास्टिकच्या कुंडीत मोगऱ्याचे रोपटे लावल्याने मुळे खराब होतात. रोपटे हळूहळू कोरडे होऊ लागते. त्यामुळे मातीच्या किंवा सिमेंटच्या कुंडीत रोपटे लावावे.

लेकीची माया अशी की आईला घरी आणण्यासाठी १६०० किलोमीटरचा प्रवास करत गेली.. आईसाठी काहीपण..

मोगऱ्याच्या वाढीस खत गरजेचं

मोगरा असो किंवा इतर झाड, प्रत्येक रोपट्याच्या वाढीस खत गरजेचं आहे. महिन्यातून एकदा मातीत शेणखत मिसळा. यामुळे रोपट्याची वाढ भरभर होईल. शिवाय रोपट्याला सुरेख पांढरेशुभ्र फुले येतील.

कपड्यांवरचे डाग काढायचा घ्या सोपा फॉर्म्युला, १ चमचा सॅनिटायझरची जादू-न घासता कपडे चकाचक

माती कोरडी होऊ देऊ नका

मोगऱ्याच्या रोपट्याची मुख्य वाढ सूर्यप्रकाशात होते. पण सूर्यप्रकाशामुळे कुंडीतली माती कोरडी होऊ लागते. यामुळे पानं पिवळी तर पडतातच, शिवाय रोपट्याला फुलंही येत नाही. त्यामुळे रोपट्याला नियमित पाणी देणं गरजेचं आहे. 

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल