Join us  

कोणतंच खत न टाकताही झाडाला येतील भरभरून लिंबू, बघा उपाय- लिंबू वेचूनच दमून जाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2024 5:34 PM

Gardening Tips For Lemon Plant: लिंबाच्या झाडाला भरभरून लिंबू येण्यासाठी हा एक अगदी सोपा उपाय करून पाहा... (How to get more lemons from plant)

ठळक मुद्दे हा उपाय केल्यामुळे लिंबाच्या रोपाला भरपूर फुलं येतील आणि काही दिवसांतच तुम्हाला त्याची भरपूर लिंबं खायला मिळतील...

सध्या लिंबू एवढे जास्त महाग झाले आहेत की एखादं रोप आपल्या कुंडीत का लावलं नाही, असं अनेकांना वाटतं. पण काही जण असेही आहेत की त्यांच्या अंगणात लिंबाचं झाड आहे किंवा कुंडीत छान लिंबाचं रोप लावलेलं आहे, पण त्याला लिंबच येत नाहीत. तुमच्या घरच्या लिंबाच्या रोपाचीही अशीच अवस्था झाली असेल तर हा एक घरगुती उपाय करून पाहा (How to get more lemons from plant). हा उपाय केल्यामुळे लिंबाच्या रोपाला भरपूर फुलं येतील आणि काही दिवसांतच तुम्हाला त्याची भरपूर लिंबं खायला मिळतील... (1 simple trick to get maximum lemons from your small plant)

 

लिंबाच्या रोपाला भरपूर लिंबू येण्यासाठी उपाय

लिंबाच्या रोपाला भरपूर लिंबू येण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीचा व्हिडिओ indiangreendreams या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

पिकलेले आंबे लवकर खराब होण्याची भीती वाटते? ३ उपाय, आंबे सडणार नाहीत..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सोपा उपाय करायचा आहे. तो म्हणजे लिंबाच्या झाडाच्या अगदी जवळ एखादं तुळशीचं रोप लावा. तुम्ही थेट जमिनीत लिंबाचं झाड लावलं असेल तर त्याच्या आजुबाजुला तुळशीची रोपं लावली तरी चालतील.

 

जर कुंडीत लिंबाचं रोप लावलं असेल तर लिंबाच्या शेजारी तुळशीची कुंडी ठेवा किंवा मग लिंबाची कुंडी मोठी असेल तर त्या कुंडीतच एका बाजुला तुळशीचं रोप लावा. 

PCOS चा त्रास होतो- पाळीत पोटही खूप दुखतं? ३ पदार्थ नियमित खा, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात.....

शेतीमध्ये आंतरपिक घेण्याची पद्धत तुम्ही ऐकलीच असेल. यानुसार काही पिकं जर एकमेकांच्या जवळ लावली तर त्यातून जे घटक बाहेर पडतात, ते एकमेकांच्या वाढीसाठी पोषक ठरतात. अशा आंतरपिकांमध्ये मग दोन्ही पिकांची वाढ अधिक जोमाने होते. त्याच आंतरपिक पद्धतीचं हे छोटंसं रूप आहे. अशा पद्धतीने जर लिंबाचं आणि तुळशीचं रोप लावलं, तर त्यामुळे दोन्ही रोपांना फायदाच होतो आणि दोघांचीही चांगली वाढ होते. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सगच्चीतली बाग