Join us  

जास्वंदाच्या फुलांना मुंग्या होत आहेत? झाडावर चिकट पांढरा मावा पडला? ३ उपाय- जास्वंदाला येतील फुलंच फुलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2023 5:34 PM

Gardening Tips: जास्वंदाच्या फुलाला मुंग्या (ants) होत असतील किंवा त्याच्यावर पांढरा मावा (mava disease) पडला असेल तर हे घरगुती उपाय तुमच्या चांगले कामी येतील...(Natural pesticides for jaswand plant)

ठळक मुद्देफुलांवर मावा पडल्यामुळे किंवा कळ्यांना मुंग्या झाल्यामुळे मग फुलांचा आकार लहान होतो आणि बऱ्याचदा फुल एका बाजूने जळालेलं, काळं पडलेलं दिसतं.

बहुतांश घरांच्या बागेत किंवा बाल्कनीमध्ये जी काही ठराविक फुलझाडे असतात त्यात एक झाड जास्वंदाचे हमखास असते. कारण देवाला वाहण्यासाठी ही फुलं चांगली उपयोगी येतात. जास्वंदाच्या झाडाला भरपूर ऊन आणि गरजेपुरतं पाणी मिळालं की तशी त्याची फारशी तक्रार नसते. पण बऱ्याचदा ऊन कमी मिळालं तर किंवा इतर काही कारणांमुळे जास्वंदाच्या फुलाला मुंग्या लागलेल्या दिसतात आणि कळीला, पानांवर पांढरा मावा पडलेला दिसतो. फुलांवर मावा पडल्यामुळे किंवा कळ्यांना मुंग्या झाल्यामुळे मग फुलांचा आकार लहान होतो आणि बऱ्याचदा फुल एका बाजूने जळालेलं, काळं पडलेलं दिसतं. असं होऊ नये म्हणून हे ३ घरगुती उपाय करून बघा (How to get rid of ants and pests or mava disease from the hibiscus or jaswand)

 

जास्वंदाच्या फुलाला मुंग्या झाल्यास उपाय

१. डेटॉल आणि हिंग

हा उपाय करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये २ ते ४ टेबलस्पून डेटॉल आणि अर्धा टेबलस्पून हिंग पावडर टाका.

"मी मुलाला पासवर्ड विचारला आणि मला धक्काच बसला कारण....." ट्विंकल खन्ना सांगते, मुलगा २१ वर्षांचा झाला आणि..

हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि ते पाणी जिथे रोग पडला आहे त्यावर शिंपडा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा.

 

२. तेजपान

मसाल्यांमध्ये वापरण्यात येणारे तेजपान किंवा तेजपत्ता जास्वंदाच्या झाडावरील कीड दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते.

पुलाव काही केल्या परफेक्ट चवीचा होत नाही? फक्त ४ पदार्थांचा मसाला करा, हॉटेलसारखा पुलाव करा घरीच...

हा उपाय एकदम सोपा आहे. त्यासाठी एक किंवा दाेन तेज पान कुंडीमध्ये मातीवर ठेवून द्या. त्याच्या सुवासामुळे मुंग्या दूर जातात.

 

३. दालचिनी

हा उपाय करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या. त्यात दालचिनीची पावडर टाकून ठेवा.

फक्त ७०० रुपयांत मिळेल स्टायलिश पंजाबी सूट, बघा ३ सुंदर फॅशनेबल पर्याय, ऑफिसवेअरसाठी परफेक्ट

सात ते आठ तासानंतर हे पाणी झाडावर जिथे रोग पडला असेल तिथे शिंपडा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय करून बघा.

 

टॅग्स :बागकाम टिप्सगच्चीतली बागइनडोअर प्लाण्ट्सखते