Lokmat Sakhi >Gardening > जास्वंदाच्या रोपाला फुलंच येत नाहीत? चहापत्तीचा करा 'असा' वापर; लालचुटूक फुलांनी बहरेल झाड

जास्वंदाच्या रोपाला फुलंच येत नाहीत? चहापत्तीचा करा 'असा' वापर; लालचुटूक फुलांनी बहरेल झाड

How to grow and care for Hibiscus flower in Monsoon? : महागडे खत कशाला? चहापत्ती आणि केळीच्या सालीचा खत म्हणून वापर कसा करावा? पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2024 06:05 PM2024-07-07T18:05:18+5:302024-07-08T18:53:56+5:30

How to grow and care for Hibiscus flower in Monsoon? : महागडे खत कशाला? चहापत्ती आणि केळीच्या सालीचा खत म्हणून वापर कसा करावा? पाहा..

How to grow and care for Hibiscus flower in Monsoon? | जास्वंदाच्या रोपाला फुलंच येत नाहीत? चहापत्तीचा करा 'असा' वापर; लालचुटूक फुलांनी बहरेल झाड

जास्वंदाच्या रोपाला फुलंच येत नाहीत? चहापत्तीचा करा 'असा' वापर; लालचुटूक फुलांनी बहरेल झाड

छोटीशी बाग तयार करताना, आपण अनेक रोपं लावतो (Gardening Tips). विविध फुलांचे झाड लावतो. गुलाब, मोगरा आणि जास्वंदाच्या रोपाचे देखील समावेश आहे. जास्वंदाचे रोप दिसायला सुंदर आणि त्याची वाढ योग्यरित्या होते (Monsoon). परंतु, नकळत घडणाऱ्या चुकांमुळे जास्वंदाच्या रोपाला फुलंच येत नाही (Hibiscus Flower). ज्यामुळे आपला हिरमोड होतो.

फक्त पानांनी झाड बहरते. फुलांचा पत्ता नसतो. जर आपल्याही जास्वंदाच्या झाडाला फक्त पानं आणि फुलं येत नसतील, तर त्यात २ घरगुती गोष्टी मिसळा. यामुळे रोपाची योग्य वाढ होईल. होममेड फर्टिलायजरमुळे पावसाळ्यातही झाड सुंदररित्या बहरेल(How to grow and care for Hibiscus flower in Monsoon?).

जास्वंदाच्या रोपाची कशी काळजी घ्यावी?

पाणी वेळेत द्या

उन्हाळा असो किंवा पावसाळा, झाडांना पाणी देणं गरजेचं आहे. पावसाळ्यात जास्वंदाच्या रोपाला जास्त पाणी देणं टाळावे. यामुळे रोपाची योग्य वाढ होत नाही. सकाळी एकदाच पाणी घाला, नंतर झाडांना पाणी देऊ नका.

सनलाईट

पावसाळ्यात सुर्यप्रकाश रोट्यांना मिळत नाही. जास्वंदाच्या रोपाला ७ ते ८ तास सूर्यप्रकाश लागते. म्हणून शक्यतो बाल्कनीच्या बाहेरील साईडला रोपटे ठेवा. यामुळे रोपट्याची योग्य वाढ होईल.

ऐन पावसाळ्यात तुळस सुकली? तुळस बहरेल- चहा झाल्यावर चहापत्तीचा करा ‘असा’ सोपा वापर

होममेड फर्टिलायझर

जास्वंदाच्या रोपासाठी पॉवरफुल होममेड फर्टिलायझर तयार करण्यासाठी, चहापत्ती आणि केळीचे साल लागेल. चहापत्तीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते. जे मातीमध्ये अॅसिडिक तयार करण्याचे काम करते.

१० दिवसात तुळस दिसेल डेरेदार - हिरवीगार! फक्त कुंडीत चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट नक्की घाला

शिवाय केळीच्या सालीमध्ये अनेक पौष्टीक घटक असतात. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि झिंक असते. ज्यामुळे रोपाची योग्य वाढ होते आणि रोपटे फुलांनी बहरते.

होममेड फर्टिलायझर करण्यासाठी सर्वात आधी केळीचे साल सुकवण्यासाठी ठेवा. नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून पावडर तयार करा. एका मोठ्या बॉटलमध्ये एक लिटर पाणी भरा. त्यात २ चमचे चहापत्ती, २ चमचे केळीच्या सालीची पावडर घालून मिक्स करा. चार तासांसाठी तसेच ठेवा. नंतर त्यात पाणी मिसळून जास्वंदाच्या झाडातील मातीमध्ये मिसळा. या होममेड फर्टिलायजरमुळे रोपाला सुंदर फुलं येतील.

Web Title: How to grow and care for Hibiscus flower in Monsoon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.