जास्वंदाच्या फुलाला खास महत्व आहे कारण जास्वदाचे लहानसे रोपं गॅलरीत असेल तर घर आणि बाल्कनी दोन्ही बहरलेले दिसते. (Gardening Tips) जास्वंदाचे फुल पुजेसाठी वापरले जाते तसंच अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये जास्वंद वापरले जाते. जास्वंदाच्या फुलाच्या वापराने केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. (How to Increase Hibiscus Blooms)
वातावरणात बदल होतो तेव्हा रोपांवरही याचा परिणाम दिसून येतो. (Tips For Gardening at Home) यामुळे कळ्या येणं बंद होतं आणि पानांचीच वाढ होते किंवा कळ्या आल्यानंतरही फुल व्यवस्थित फुलत नाहीत. जास्वंदाच्या फुलांची वाढ होण्यासाठी काही सोप्या गार्डनिंग टिप्स पाहूया. (Tips to Increase Flowering in Hibiscus)
१) हिंग आणि चहा पावडरचा वापर
जास्वदाच्या फुलासाठी तुम्ही केमिकल्सयुक्त फर्टिलायजर्सचा उपयोग केला तर पानं आणि कळ्या सुकू लागतात. याऐवजी तुम्ही घरगुती उपायांचा वापर करून खर्चात फुल फुलवू शकता. यासाठी चहा पावडर किंवा ग्रीन टी एक लिटर पाण्यात मिसळून घ्या. जेव्हा चहा पावडर पाण्यात व्यवस्थित भिजेल तेव्हा त्यात एक चमचा हिंग घालून पुन्हा ढवळून घ्या. नंतर हिंग मिसळा. हिंग यात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जास्वंदाच्या रोपांत पाणी घाला. १५ दिवसांच्या अंतराने तुम्ही झाडांना हे पाणी घालू शकता. काही दिवसांत झाडाला भरपूर कळ्या लागलेल्या दिसून येतील.
१ चमचा हळदीने काळेभोर होतील पिकलेले केस; हळदीचा ३ प्रकारे वापर करा-मिळवा सुंदर केस
२) कटींग आणि माती बदलत राहा
३ ते ४ महिन्यांनंतर झाडाची कटींग करत राहा. यामुळे नवीन फांद्या, पानं वेगाने येतात. फांद्या केसांची उत्तम वाढ दर्शवतात. याव्यतिरिक्त १ वर्ष किंवा ६ महिनायांनी जमिनीच्या आजूबाजूची माती खोदून माती बदलून घ्या. ही माती बदलून त्यात दगड रेतीत माती मिसळून घाला. यामुळे पाणी जास्तवेळ झाडात राहणार नाही.
रोज २ वेळा धुवूनही चेहऱ्यावर पिंपल्स येतात? पाण्यात 'हा' पदार्थ मिसळा; ग्लोईंग, फ्रेश दिसेल चेहरा
३) पिवळ्या मोहोरीची पावडर
स्वंयपाकघरात २ प्रकारच्या मोहोऱ्यांचा वापर केला जातो. एक काळी आणि दुसरी पिवळी. पिवळ्या मोहोरीचा वापर तुम्ही जास्वंदाच्या फुलांसाठी करू शकता. यासाठी ५० ग्राम पिवळी मोहोरी घ्या आणि वाटून याची पावडर बनवून घ्या ही पावडर एक लिटर पाण्यात मिसळून जास्वंदाच्या झाडांत घाला हे मिश्रण १५ दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा झाडांना घाला. यामुळे फुलं चांगली बहरतील.
जास्वंदाला किडे, मुंग्या लागू नयेत यासाठी काय करावे? (How to get rid of insects pests on hibiscus plant)
जास्वंदाच्या झाडाला मुंग्या लागू नये म्हणून कडुलिंबाच्या पानांचे पाणी उकळून त्याचा स्प्रे या झाडांवर मारा किंवा कडुलिंबाच्या तेलाचा स्प्रे सु्द्धा करू शकता. याशिवाय झाडावर जास्त वेगाने पाणी मारा जेणेकरून किटक दूर राहतील.