अनेक भारतीय घरात मनी प्लांट (Money Plant) आपल्याला सापडेल. बऱ्याच लोकांना घरी मनी प्लांट ठेवायला आवडतं. पण अनेकदा रोप सुकतं किंवा वेलीची व्यवस्थित वाढ होत नाही. मनी प्लांटची व्यवस्थित काळजी घेतली तर ते वर्षानुवर्ष चांगले टिकते. पण त्याकडे दुर्लक्ष केले तर, ते रोप सुकत जाते. नव्या वर्षात अनेक जण रोप लावतात. जर आपण देखील नवीन वर्षानिमित्त घरात मनी प्लांट लावत असाल तर, काही गोष्टी लक्षात ठेवा.
मनी प्लांट घरात लावल्याने सकारात्मक वातावरण राहण्यास मदत होते. याचे अनेक फायदे आहेत. पण घरात मनी प्लांट लावायचा कुठे आणि कशात असा प्रश्न हमखास तुम्हाला देखील पडला असेल. काही लोकं मनी प्लांट पाण्यामध्ये लावतात, तर काही मातीत. पण मनी प्लांट नेमकं कशात लावावा? मनी प्लांट कशात लावल्याने त्याची चांगली वाढ होईल? पाहा मनी प्लांटच्या निगडीत काही खास टिप्स(How To Grow and Care For Money Plant).
अशी घ्या मनी प्लांटची काळजी
- मनी प्लांट कुठेही लावतो येतो. आपण ते माती किंवा पाण्यात लावू शकता. पण त्याची वाढ योग्यरित्या व्हावी असे वाटत असेल तर, मनी प्लांट मातीत लावा. जर आपण नवीन रोप आणलं असेल तर, मोठ्या कुंडीत रोप लावा. नंतर त्यात माती भरा. खताचा लवकर वापर करू नका. कारण खतामुळे त्याची मुळे कुजू शकतात. शिवाय मनी प्लांटला दररोज पाणी देऊ नका. असे केल्याने त्याची वाढ चांगली होणार नाही. माती आणि कमी पाण्यामुळे मनी प्लांटची वेल वाढत वरच्या दिशेने जाईल, शिवाय पिवळी पडलेली पानं छाटायलाही सोपे जाईल.
तुळस वाढत नाही, कोमेजली? मातीत मिसळा ही खास पावडर, तुळस होईल डेरेदार
- जर आपण मनी प्लांट पाण्यात लावत असाल तर, दर १५ ते २० दिवसांनी पाणी बदलत राहा. शिवाय जेव्हा मनी प्लांटचे पाणी बदलाल तेव्हा त्यात एस्पिरिनची गोळी घाला. यामुळे मनी प्लांटची वाढ होण्यास मदत होईल. तसेच, मनी प्लांटचा नोड पाण्याखाली ठेवावा, अन्यथा वाढ योग्यरित्या होणार नाही.