तुळशीचं रोप अनेकांच्या घराबाहेर दिसते (Monsoon). तुळशीला पाणी- ऊन- खत अशा सगळ्याच गोष्टी मिळाल्यास, तुळस बहरते. तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, जस्त आणि लोहाचे प्रमाण अधिक असते (Tulsi Plant). ज्याचा फायदा आरोग्याला होतो. पण बदलत्या ऋतूनुसार तुळशीच्या रोपट्याची विशेष काळजी घ्यायला हवी.
ऐन पावसाळ्यात तुळशीचे रोपटे सुकते किंवा वाढ खुंटते. तुळशीची हिरवी पानं काळी किंवा पिवळी पडतात. त्यामुळे पावसाळ्यात तुळशीच्या रोपट्याची काळजी घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? यासाठी एक घरगुती खत तयार करा. तुळस बहरेल(How To Grow And Care For Tulsi Plant in Monsoon).
पांढऱ्या शर्टाच्या कॉलरवरचे हट्टी डाग घासूनही निघत नाही? फक्त २ उपाय; कपडे दिसतील चकाचक
तुळशीची पानं पिवळी का पडतात?
- तुळशीच्या रोपट्याला योग्य प्रमाणात पाणी द्यायला हवे. जास्त पाणी दिल्यास तुळशीची पाने पिवळी पडतात. याशिवाय जास्त पाणी दिल्याने तुळशीच्या मुळांवर बुरशी येते. ज्यामुळे तुळशीची पानं हिरवी होण्याऐवजी पिवळी किंवा काळी पडतात.
वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय
घरगुती खत कसे बनवायचे?
तुळशीसाठी आपण खास घरगुती खत तयार करू शकता. यासाठी उरलेली चहापत्ती घ्या. दोन वेळा पाण्यात धुवून घ्या, आणि वाळत ठेवा. एका बाऊलमध्ये एक चमचा हळद घ्या. त्यात ३ चमचे चहापत्ती घालून मिक्स करा. नंतर केळ्याची साल सुकवून त्याची पावडर तयार करा आणि मिश्रणात घालून मिक्स करा. तयार पावडर मातीमध्ये मिसळा. नंतर मातीमध्ये थोडं पाणी घाला. या घरगुती खतामुळे तुळशीची योग्य वाढ होईल.