घर सुशोभित दिसण्यासाठी आपण अनेक गोष्टींचा वापर करतो. मुख्य म्हणजे घरात कायम सकारात्मक वातावरण राहावे यासाठी अनेक झाडं लावली जातात. तुळस, गुलाब, कोरफड, मोगरा यासह मनी प्लांट देखील लावण्यात येते. मनी प्लांटमुळे बाल्कनीची शोभा वाढते. मनी प्लांटच्या वेलीची लटकणारी पानं गॅलरी, हॉलची भिंत, यासह संपूर्ण घराची शोभा वाढवतात. पण बऱ्याचदा मनी प्लांटची वाढ योग्यरित्या होत नाही (Money Plant).
अनेकदा पान पिवळी पडतात, किंवा गळतात. असं वारंवार होत असेल तर, आपल्याकडून नकळत घडणाऱ्या चुकांमुळे मनी प्लांटची योग्य वाढ होत नसेल. जर आपण मनी प्लांटचं झाड कुंडीत लावत असाल तर, लावताना एक पांढरा पदार्थ मिक्स करा (Gardening Tips). यामुळे नक्कीच मनी प्लांटची योग्य प्रकारे वाढ होईल(How to Grow and Take Care of your Money Plant).
मनी प्लांटची हिरवीगार वाढ होण्यासाठी फॉलो करा काही खास टिप्स
- थंड वातावरणात म्हणजेच हिवाळ्यात मनी प्लांटची पानं पिवळी पडतात. शिवाय पानं गळतात. असं होऊ नये म्हणून झाड नेहमी सूर्यप्रकाशाजवळ लावावे. यामुळे रोपाची पानं गळणार नाही.
मातीत मिसळा फक्त ३ गोष्टी, कुंडीत लावलेले कडीपत्त्याचे झाडही होईल मोठे-पानं होतील सुगंधी
- मनी प्लांट आकारानुसार छोट्या किंवा मध्यम आकाराच्या कुंडीत लावा. मनी प्लांटचा आकार इतका असावा की मूळं जास्त प्रमाणात पसरणार नाहीत.
- मनी प्लांटची योग्य वाढ व्हावी यासह पानं कायम हिरवीगार राहावी यासाठी एप्सम मीठ आणि युरिया खताचा वापर करून पाहा. एप्सम मिठाच्या वापरामुळे मनी प्लांट सुंदररित्या बहरेल.
तुळस सतत सुकते, पानांवर काळी बुरशी पडते? तुळशीला पाणी घालताना तुम्ही करता ६ चुका
- यासाठी एक लिटर पाण्यात एक चमचा एप्सम मीठ घालून मिसळा, आणि दुसऱ्या एका बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात युरिया खत मिसळून, मातीत मिक्स करा; आणि एप्सम मिठाचे पाणी झाडावर शिंपडा. आपण याचा वापर महिन्यातून एकदा करू शकता. यामुळे नक्कीच मनी प्लांटची वाढ होईल.