Lokmat Sakhi >Gardening > मनी प्लांटवर बुरशी -पानंही पिवळी पडतात? कुंडीतल्या मातीत मिसळा फुकट मिळणारी १ गोष्ट; दिसेल जादू

मनी प्लांटवर बुरशी -पानंही पिवळी पडतात? कुंडीतल्या मातीत मिसळा फुकट मिळणारी १ गोष्ट; दिसेल जादू

How to Grow and Take Care of your Money Plant in Summer Season : मनी प्लांट वाढेल भरभर - बालकनीही दिसेल सुंदर; फक्त ३ गोष्टी लक्षात ठेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 05:11 PM2024-04-24T17:11:00+5:302024-04-24T17:12:28+5:30

How to Grow and Take Care of your Money Plant in Summer Season : मनी प्लांट वाढेल भरभर - बालकनीही दिसेल सुंदर; फक्त ३ गोष्टी लक्षात ठेवा..

How to Grow and Take Care of your Money Plant in Summer Season | मनी प्लांटवर बुरशी -पानंही पिवळी पडतात? कुंडीतल्या मातीत मिसळा फुकट मिळणारी १ गोष्ट; दिसेल जादू

मनी प्लांटवर बुरशी -पानंही पिवळी पडतात? कुंडीतल्या मातीत मिसळा फुकट मिळणारी १ गोष्ट; दिसेल जादू

बऱ्याच लोकांना घरात मनी प्लांट ठेवायला आवडतं (Money Plant). पण उन्हाळ्यात रोप सुकतं. किंवा वेलीची व्यवस्थित वाढ होत नाही. घरात आपण मनी प्लांटचं रोप आणून ठेवतो (Gardening Tips). पण रोपाची योग्य काळजी न घेतल्यामुळे सुकत जाते. घरात मनी प्लांट लावण्याचे अनेक फायदे आहे (Summer Special). मनी प्लांट कुंडीत किंवा पाण्यातही लावण्यात येते.

काही लोक बाल्कनीमध्ये मनी प्लांट लावतात. तर काही घराच्या बाहेर. पण बाल्कनीमध्ये लावलेल्या मनी प्लांटची पानं लवकर पिवळी पडत असतील तर, तर रोपाची काळजी घेताना काही गोष्टी लक्षात ठेवा. या घरगुती टिप्समुळे भर उन्हातही रोपाची वाढ होईल, शिवाय मनी प्लांटची पानं लवकर पिवळी पडणार नाहीत(How to Grow and Take Care of your Money Plant in Summer Season).

उन्हाळ्यात मनी प्लांटची पानं पिवळी पडू नये म्हणून..

छाटणी गरजेची

मनी प्लांटची योग्य वाढ व्हावी म्हणून पिवळ्या पानांची छाटणी करणे गरजेचं आहे. बऱ्याचदा मनी प्लांटची पानं पिवळी पडतात. अशावेळी ती पिवळी पानं छाटायला हवेत. पानांची छाटणी केल्याने मनी प्लांट भरभर वाढते.

विराट कोहलीला आवडणारं ‘सुपरफूड सॅलेड’ करा फक्त १० मिनिटांत, विराटसारखा फिटनेस हवा तर..

खताचा वापर करा

मनी प्लांटला कोणत्याही विशेष खताची गरज नसली तरी, आपण कुंडीत शेणखत मिसळू शकता. यामुळे झाडाची चांगली वाढ होण्यास मदत होते. आपण या खताचा वापर महिन्यातून २ वेळा करू शकता. यामुळे मनी प्लांटची योग्य वाढ होईल.

ना मिक्सर - ना पाटा वरवंटा; २ मिनिटात आलं - लसूण पेस्ट करण्याची सोपी ट्रिक; टिकेल महिनाभर

मनी प्लांटची होईल वाढ

अनेकदा मनी प्लांटच्या पानांना बुरशी येते. किंवा पानंही पिवळी पडतात. झाडांना बुरशी येऊ नये म्हणून कुंडीतल्या मातीत हळद, नारळ पाणी किंवा एप्सम मीठ मिक्स करू शकता. यामुळे मनी प्लांटची योग्य वाढ होईल. 

Web Title: How to Grow and Take Care of your Money Plant in Summer Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.