बदलत्या ऋतूनुसार जशी आरोग्याची काळजी घ्यावी लागते, तशीच झाडांचीही काळजी घेणं गरजेचं (Tulsi at Home). सध्या कधी ऊन तर कधी पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी आरोग्य तर बिघडतेच, शिवाय झाडं देखील कोमेजतात. त्यामुळे झाडांचीही तितकीच काळजी घ्यायला हवी (Gardening Tips). आपल्या घराच्या छोट्याश्या बाल्कनीमध्ये तुळशीचं रोप असतेच.
तुळशीच्या रोपाचे अनेक फायदे आहेत. या रोपाची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. पण बदलत्या ऋतूनुसार तुळशीच्या रोपामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. जर कुंडीतले रोप वारंवार सुकत असेल किंवा, कोमेजून जात असेल तर, त्यात चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट मिसळून पाहा. तुळशीच्या रोपाची योग्य वाढ होईल. डेरेदार दिसेल आणि हिरवीगार तुळस अंगणी डोलू लागेल(How to Grow Basil at Home).
कुंडीतल्या तुळशीची कशी काळजी घ्याल?
- रोपाची योग्य वेळी छाटणी करणं गरजेचं आहे. तुळस नेहमी भरीव दिसण्यासाठी योग्य वेळी योग्य पद्धतीने छाटणी करीत राहा. तुळशीच्या रोपाला बिया किंवा मांजरी आल्यास लगेच कापून टाका. मांजरीमुळे झाडाची वाढ खुंटते.
३० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या मुलीसाठी आईबाबा आता शोधताहेत नवरा, लग्नाचं हे काय भलतंच प्रकरण?
- तुळस लावण्यासाठी नेहमी योग्य कुंडीची निवड करा. कुंडी फार लहान नसावी किंवा जास्त मोठीही नसावी. कुंडी नेहमी मध्यम आकाराची निवडावी. यामुळे तुळशीच्या रोपाला कुंडीत वाढण्यासाठी आवश्यक जागा मिळते. तुळशीचे रोप लावण्यासाठी कमीत कमी १२ इंचाची कुंडी निवडावी.
- तुळशीच्या रोपाची योग्य पद्धतीने वाढ व्हावी म्हणून, मातीची देखील तितकीच काळजी घ्या. तुळशीची लागवड करताना ५०% बागेची माती आणि २०% वाळू असावी. यामुळे पाणी घालताना तुळशीच्या मुळांना पाणी मिळेल.
- महिन्यातून एकदा कुंडीतल्या मातीत खत घालायला विसरू नका. तुळशीच्या रोपाच्या मातीत आपण गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत मिसळू शकता.
धुवून धुवून काळे कपडे धुरकट दिसतात? ४ सोप्या ट्रिक्स, काळे कपडे कायम दिसतील चमकदार
- जर तुळशीच्या पानांना कीड लागली असेल किंवा, पिवळी पडत असेल तर, वाटीभर पाण्यात चमचाभर कडूलिंबाचं तेल मिसळा, आणि रोपावर शिंपडा. तुळशीची पानं कायम हिरवीगार राहील.
- तुळशीच्या योग्य वाढीसाठी आपण त्यात एप्सम सॉल्टचा वापर करू शकतो. यासाठी चमचाभर एप्सम सॉल्ट घ्या. मातीमध्ये एप्सम सॉल्ट मिसळा. आणि त्यावर पाणी घाला. या मिठातील पोषक तत्वांमुळे रोपाची वाढ योग्य होते. शिवाय तुळशीची पानं पिवळी पडत नाहीत.